31.8 C
Pune
Tuesday, March 31, 2026
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*अदिती देशमुख यांनी शेतकऱ्यांना केले आवाहन*

*अदिती देशमुख यांनी शेतकऱ्यांना केले आवाहन*

शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर फळझाडाची लागवड करावी,

यातून पर्यावरण संवर्धना सोबत शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल

सौअदिती अमित देशमुख  

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांच्या प्रमुख उपस्थितीत

लातूर तालुक्यातील हरंगुळ येथील शेतकऱ्यांना फळझाडाचे वाटप

लातूर प्रतिनिधी : (शुक्रवार दि. २९ मे २०२२)

   लातूर मधील वनक्षेत्र अत्यंत कमी आहे वनक्षेत्र वाढविण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड होणे आवश्यक आहे. वृक्षलागवडीच्या या मोहीमेत सहभाग घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर फळझाडांची लागवड करावी, यातून पर्यावरण संवर्धना सोबत शेतकऱ्यांना आर्थिक फायदा देखील होईल, असे प्रतिपादन ट्वेन्टीवन ॲग्री लि.,च्या संचालीका व गोल्ड क्रेस्ट स्कुल ऑफ ग्रुपच्या प्रमुख सौ. अदिती अमित देशमुख यांनी केले आहे. त्या विलासराव देशमुख फाऊंडेशन, लातूर ट्रीच्या व अंकूर नर्सरीच्या माध्यमातून वृक्ष वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या.

     पर्यावरण संवर्धनासाठी भौगोलीक क्षेत्राच्या ३० एवढे असणे गरजेचे आहे. लातूर जिल्हयातील वनक्षेत्र प्रमाण ०.१७ एवढे आहे. भौगोलीक क्षेत्राच्या तुलनेत हे वनक्षेत्र कमी असल्यामुळे वृक्षलागवड मोहीम वाढविण्यासाठी विलासराव देशमुख फाऊंडेशन व लातूर ट्रीच्या माध्यमातून वृक्ष लागवड चळवळ राबविण्यात येत आहे. या चळवळीस चालना देण्यासाठी ट्वेन्टीवन ॲग्री लि.,च्या संचालीका व गोल्ड क्रेस्ट स्कुल ऑफ ग्रुपच्या प्रमुख सौ. अदिती अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि. २९ जूलै रोजी लातूर तालुक्यातील हरंगुळ येथील शेतकऱ्यांना १ हजार फळझाडे व अंकूर नर्सरीच्या वतीने ५०० फळझाडाचे वाटप करण्यात आले.

   या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ट्वेन्टीवन ॲग्री लि.,च्या संचालीका व गोल्ड क्रेस्ट स्कुल ऑफ ग्रुपच्या प्रमुख सौ. अदिती अमित देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधीकारी पृथ्वीराज बी.पी., संस्थेच्या समनव्यक संगिता मोळवणे, अंकुर हायटेक नर्सरीचे संचालक धनंजय राऊत, गावचे सरपंच दादाराव पवार, उपसरपंच धनराज पाटील, अविनाश देशमुख, डॉ.दीपक देशमुख उपस्थित होते.

  यावेळी ट्वेन्टीवन ॲग्री लि., च्या संचालीका व गोल्ड क्रेस्ट स्कुल ऑफ ग्रुपच्या प्रमुख    सौ. अदिती अमित देशमुख यांनी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील बांधावर, पडीक जमीन व रीकामे असलेल्या क्षेत्रावर फळझाडाची लागवड करावी. यामुळे शेतकऱ्यांना फळझाडापासून मोबदला मिळू शकतो. शिवाय लातूरमधील वृक्ष लागवडीमध्ये वाढ होवून पर्यावरण संवर्धनास मदत होईल असे सांगितले.

लातूर ट्रीच्या पुढाकारतून ४३ हजार वृक्षलागवड

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी केले कौतूक

  यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांना लातूर शहरासह जिल्हाभरात वनक्षेत्र वाढविण्यासाठी विलासराव देशमुख फाऊंडेशन व लातूर ट्रीच्या माध्यमातून वृक्ष लागवड चळवळ राबविण्यासाठी व वाढविण्यासाठी येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. विलासराव देशमुख फाऊंडेशन व लातूर ट्रीच्या माध्यमातून व महाराष्ट्र नर्सरी असोशीएशन पूढाकारातून सन २०१६ मध्ये लातूर शहर आणि परीसरात १० हजार वृक्षलागवड करण्यात आली. सन २०१७ मध्ये विलास कारखाना पूढाकारातून लातूर ग्रामिण मध्ये ६ हजार वृक्षाची लागवड करण्यात आली. सन २०१७ मध्ये लातूर शहरासह लगतच्या पांखरसागवी, हरंगुळ खु, सिंकदरपूर येथे वृक्षलागवड करण्यात आली. सन २०१९-२० मध्ये मांजरा कारखाना येथे देवराई नावाने वृक्ष लागवड करण्यात आली. सन २०१९ ते २०२२ या काळात वृक्षलागवड सोबत तुट झालेल्या वृक्षाच्या ठिकाणी पुर्नलागवड करण्यात आली. लातूर शहरासह ग्रामिण भागात रस्त्याच्या दु़तर्फा, शाळा, प्रागंण परीसरात लातूर ट्री कडून ४३ हजार वृक्ष लागवड करण्यात आली असून ३२ हजार वृक्ष आज डौलदारपणे उभी आहेत, तसेच  विलासराव देशमुख फाऊंडेशनच्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक, महिला सशक्तीकरण, उद्योग, शासकीय योजना, आरोग्य, वृक्षारोपण कार्यबद्दल आणि दत्तक घेतलेल्या गावात राबविण्यात येणाऱ्या योजना बद्दल माहिती देण्यात आली. या सर्व उपक्रमाचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी कौतूक केले.

   या कार्यक्रमास नरशिंगे सर, जाधव सर, अमीर शेख, पार्वती होळकर, स्वामी मॅडम, सुचिता झुंजे, सोशल प्लॅनर गजानन बोयणे, मीर करपुडे, सोमनाथ झुंजे, संगमेश्वर झुंजे, रविकुमार शिंदे, ज्ञानेश्वर पवार, भुजबळ श्रीकांत, महादेव मसलकर, प्रशांत वाघमारे, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]