*आमदार अभिमन्यू पवार यांची सरकारवर टीका*

0
343

निद्रिस्त आघाडी सरकारला जागे करण्यासाठी आ. अभिमन्यू पवार यांची तुळजापूर पदयात्रा….. 

आघाडी सरकारवर आ. अभिमन्यू पवार यांची सडकून टीका… 

निलंगा,-(प्रशांत साळुंके)- अतिवृष्टीने नुकसान झालेले खरीप हंगामातील पिकांचे नुकसान व शासन व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाहून गेला आहे. मायबाप म्हणून घेणाऱ्या राज्य सरकारने या शेतकऱ्यांना तातडीने मदत देणे आवश्यक होते मात्र असंवेदनशील सरकारने तीन आठवड्यानंतर मदत जाहीर केली तीही तुटपुंजी त्याच बरोबर पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने निर्देश देणे आवश्यक होते.यामध्ये तुटपुंजी मदतीची घोषणा करणारे हे सरकार उपकाराची भाषा करीत आहे.तर गतवर्षीचा पीकविमा मिळावा यासाठी शासनाने निर्देश देणे आवश्यक होते मात्र या निद्रिस्त असलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. यामुळे या सरकारला जागं येवून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांसह औसा ते तुळजापूर पदयात्रा काढली आहे.

या पदयात्रेची सुरुवात दि.१६ आॅक्टोबर रोजी औसा येथून जेष्ठ नागरिक व्यंकटनाना मोरे यांनी झेंडा दाखवून या यात्रेला सुरुवात झाली.या सरकारला सद्बुद्धी द्यावी यासाठी महाराष्ट्राचे कुलस्वामिनी तुळजा भवानीला साकडे घालणार असून आई तुळजाभवानी च्या चरणी अतिवृष्टीने नुकसान झालेले सोयाबीन ठेवणार असल्याचे आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले.या पदयात्रेत माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड,माजी आमदार पाशा पटेल,माजी आमदार सुधाकर भालेराव,भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता,माजी नगराध्यक्ष किरण उटगे, निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, शहराध्यक्ष लहू कांबळे, भाजपचे गटनेते सुनील उटगे, प्रा. भिमाशंकर राचट्टे, काकासाहेब मोरे,गोपाळ धानूरे, समीर डेंग, संजय कुलकर्णी,ज्ञानेश्वर वाकडे, हमीद शेख, पप्पूभाई शेख,शिव मुरगे, मुक्तेश्वर वागदरे, अरविंद कुलकर्णी, धनंजय होळकुंदे, कल्पना ढविले, ज्योती हालकुडे यांच्यासह शेकडो शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले यावेळी आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की अस्मानी व सुलतानी संकटात उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारकडून तातडीने मदत मिळणे अपेक्षित होते. मात्र असंवेदनशीलतेचा कळस गाठलेल्या या सरकारचे नेतृत्व करणार मुख्यमंत्री व मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा आणि दुःख समजून घ्यायला वेळ नाही विशेष म्हणजे पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांना तात्काळ विमा रक्कम मिळणे आवश्यक होते. मात्र या विमा कंपनीची मुजोरपणा कमी करून शेतकर्‍यांना विमा देण्यात यावा असे निर्देश सरकारने दिले नाही. या परिस्थितीत शेतकरी संकटात असताना रब्बीची पेरणी करणे सुध्दा अवघड आहे. या पाश्र्वभूमीवर सरकारला सद्बुद्धी येवू व सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी यासाठी शेतकऱ्यांसह आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा – तुळजापूर पदयात्रा काढली आहे.

अतिवृष्टीत शेतात कुजलेले पीक आणि वाढलेले गवत काढून रब्बीची तयारी करण्यासाठीही आणि खते बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे नाहीत. खरीप पावसाने नेले आणि रब्बीसाठी खिशात कांहीच शिल्लक नाही. गेल्या वर्षीही अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचे पूर्णपणे नुकसान झाले. या पदयात्रेचे जागोजागी स्वागत करण्यात आले. औसा शहरात मुस्लिम बांधवांकडून आ. अभिमन्यू पवार यांचे शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here