32.3 C
Pune
Saturday, March 21, 2026
Homeलेखआमदार अमित विलासराव देशमुख यांची वाटचाल

आमदार अमित विलासराव देशमुख यांची वाटचाल

माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांची वाटचाल:

समर्थ नेतृत्वाचा आणि आधुनिक विकासाचा प्रवास

लेखक : राहूल हरिभाऊ इंगळे-पाटील

लोकनेते विलासराव देशमुख यांचा ‘माणसं जोडण्याचा’ समृद्ध वारसा आणि माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांची ‘प्रशासकीय शिस्त, लोकसंपर्क, उपक्रमशीलता व तंत्रज्ञानाची’ आधुनिक जोड असलेली कार्यपध्दती — हाच लातूरच्या प्रगतीचा खरा मंत्र आहे.”

आज २१ मार्च रोजी त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छामहाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि तंत्रस्नेही नेतृत्व म्हणून माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.. गेल्या २५ वर्षांतील त्यांचा प्रवास हा केवळ सत्तेचा सोपान नसून, तो कृषी, सहकार, आरोग्यसेवा, तंत्रज्ञान, प्रशासकीय शिस्त आणि जनसेवेचा एक अनोखा संगम आहे. वडिलांचा वारसा सांगतानाच, स्वतःच्या कर्तृत्वाने राजकारणात एक आश्वासक स्थान निर्माण करणारे अमित देशमुख आज राज्याच्या राजकारणातील एक प्रभावी व्यक्तिमत्व ठरले आहेत.माजी मंत्री, अमित विलासराव देशमुख यांच्या राजकीय प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात सन १९९७ मध्ये युवक काँग्रेसच्या माध्यमातून झाली. त्यांनी केवळ लातूरपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये पक्ष संघटना बळकट करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून सन २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ अशा सलग चार निवडणुकांत त्यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवून जनतेचा अढळ विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या संघटनात्मक कौशल्याची पहिली मोठी प्रचिती २०१२ च्या लातूर महानगरपालिका निवडणुकीत आली. ७० पैकी ४९ जागांवर काँग्रेसला ऐतिहासिक बहुमत मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. नुकत्याच झालेल्या लातूर शहर महानगरपालीका निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली ७० पैकी काँग्रेस वंचीत आघाडीला ४७ जागा मिळून सत्ता हाती आली आहे.माजी मंत्री, अमित विलासराव देशमुख यांना जेंव्हा जेंव्हा मंत्रीमंडळात जबाबदारी मिळाली, तेंव्हा त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे.

त्यांच्या कारकिर्दीचे दोन महत्त्वाचे टप्पे राज्याच्या विकासासाठी दिशादर्शक ठरले: राज्यमंत्री (२०१४): पर्यटन आणि ऊर्जा विभागाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला मोठी चालना दिली. पवन ऊर्जेची क्षमता वाढवण्यासाठी राज्यात ३९९ वारा परिमापन केंद्रे उभारण्याचा धाडसी निर्णय त्यांच्या काळात घेण्यात आला.कॅबिनेट मंत्री (२०१९-२०२२): वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून त्यांनी कोरोनाच्या जागतिक महासंकटात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी युद्धपातळीवर काम केले. लातूरचे पालकमंत्री म्हणून त्यांनी अवघ्या १०० दिवसांत १००० कोटींचा निधी जिल्ह्यासाठी खेचून आणला. यामध्ये ‘विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी’ १०० कोटींची अद्ययावत बाह्य रुग्ण (OPD) इमारत आणि २०० खाटांचे स्वतंत्र स्त्रीरोग व बाल रुग्णालय मंजूर करून लातूरला ‘मेडिकल हब’ बनवण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले.वैद्यकीय शिक्षण विभागातील क्रांती वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून अमितजींनी कोरोना विरुद्धच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली सुरुवातीला राज्यात फक्त ३ प्रयोगशाळा होत्या, त्या १००० पर्यंत वाढवल्या. ६ कोटी लोकांची तपासणी आणि २० समर्पित रुग्णालयांची उभारणी केली. राज्यात ८० ऑक्सिजन प्लांट (४० लिक्विड आणि ४० पीएसए) तातडीने उभारले. ८ हजार ऑक्सिजन आणि ३ हजार व्हेंटिलेटर बेड निर्माण केले. ३ हजार रुग्णांवर मोफत उपचार आणि २५०० यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. वैद्यकीय प्रवेशातील जाचक ‘७०:३०’ कोटा पद्धत रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, ज्याचा सर्वाधिक फायदा मराठवाडा आणि विदर्भातील गुणवंत विद्यार्थ्यांना झाला. प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन पहिल्या टप्प्यात ८ आणि दुसऱ्या टप्प्यात ५ नवीन महाविद्यालयांना मंजुरी दिली.माजी मंत्री, अमित विलासराव देशमुखनी केमिकल इंजिनिअरिंगच्या ज्ञानाचा उपयोग सहकार क्षेत्रात अत्यंत कल्पकतेने केला आहे.

‘विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा’ आदर्श घेवून त्यांनी उभारणी केलेले ‘विलास साखर कारखाना’, टवेन्टिवन शुगर्स हे कारखाने आज राज्यासाठी ‘मॉडेल’ ठरले आहेत.यांत्रिकीकरण (Mechanization): ऊसशेतीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी ऊसलागवड, आंतरमशागत आणि ऊस तोडणी मजुरांच्या टंचाईवर मात करण्यासाठी त्यांनी यांत्रिकीकरण (Harvesters) यशस्वीपणे राबवले, ज्यामुळे साखर उद्योगात मोठी क्रांती झाली.सह-वीज निर्मिती: उभारणी केलेल्या कारखान्यांमध्ये उपपदार्थ प्रकल्पाची सह-वीज निर्मिती प्रकल्प आणि इथेनॉल प्रकल्पाची यशस्वी उभारणी करून त्यांनी सहकाराला उर्जेची जोड दिली.राष्ट्रीय सन्मान: त्यांच्या उत्कृष्ट आर्थिक आणि तांत्रिक नियोजनामुळे ‘विलास’ कारखान्याला आजवर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील ३७ पुरस्कार मिळाले आहेत.केवळ राजकारण न करता, अमितजींनी पर्यावरणाशी आपली बांधिलकी नेहमीच जपली आहे. ज्या ज्या संस्था उभा केल्या तेथे पर्यावरणपूरक व संवर्धनाचे वातावरण ठेवले आहे. या शिवाय वृक्षारोपणाची चळवळ आणि पर्यावरण संदर्भात उपक्रम राबवून त्यांनी आपल्या निसर्गप्रेमाची साक्ष दिली आहे. बदलत्या काळाची पावले ओळखून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून (वाटसअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम) थेट जनतेशी संवाद साधतात. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी विशेष हेल्पलाईन आणि व्हॉट्सॲप सुविधा उपलब्ध करून दिली आहे, जी त्यांच्या पारदर्शक कामकाजाचे प्रतीक आहे.मार्च २०२५ मध्ये महाराष्ट्र विधानसभा काँग्रेस पक्षाच्या ‘मुख्य प्रतोद’पदी झालेली त्यांची निवड, हे त्यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाचे आणि पक्षनिष्ठेचे प्रतीक आहे. पक्षातील अनुभवी नेत्यांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचे प्रेम मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

लोकनेते विलासरावजींची ‘माणसं जोडण्याची कला’ आणि अमितजींची ‘प्रशासकीय शिस्त व आधुनिक दृष्टी’ यांचा हा मेळ लातूरला भविष्यात ‘सहकार, कृषी, वैद्यकीय आणि औद्योगिक हब’ म्हणून जागतिक नकाशावर नेण्यासाठी सज्ज आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एक लोकप्रिय, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून अमित देशमुख यांचे स्थान आता अधिक प्रबळ झाले आहे.माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख हे केवळ एका मोठ्या नेत्याचे पुत्र म्हणून नव्हे, तर आपल्या कर्तृत्वाने आणि विकासाच्या ध्येयाने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आश्वासक नेतृत्व म्हणून ठामपणे उभे आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच लोकसेवा घडो, हीच सदिच्छा!

लेखक : राहूल हरिभाऊ इंगळे-पाटील मोबाईल ९८९०५७७१२८

no

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]