आमदार निलंगेकर यांची मागणी

0
191

 

जिल्ह्यातील जलाशय पुर्ण भरल्यास कालव्याद्वारे पाणी सोडावे

आ. संभाजी पाटील निलंगेकरांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

लातूर/प्रतिनिधी ः- मागील कांही वर्षाचा अनुभव व हवामान खात्याचा अंदाजानुसार परतीचा पाऊस नजीकच्या काळात पडण्यास सुरुवात होईल. या पावसाचे पाणी जिल्ह्यातील जलाशयामध्ये पुर्ण क्षमतेने साठवणुक झाल्यानंतरच अतिरिक्त होणारे पाणी कालव्याद्वारे सोडावे अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे पत्राद्वारे केली आहे.

जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. तरीही जिल्ह्यातील जलाशय तथा प्रकल्पाच्या परिसरात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन मागील वर्षाचा अनुभव पहाता आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार परतीचा पाऊस नजीकच्या कालावधीमध्ये पडण्यास सुरुवात होणार आहे. या पावसाचे पाणी जिल्ह्यातील जलाशयामध्ये पुर्ण क्षमतेने साठवणुक करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर सर्व प्रकल्पही पुर्णक्षमतेने भरून घेणे तितकेच महत्वाचे आहे. यानंतरही प्रकल्प व जलाशय पुर्ण क्षमतेने भरल्यास यामधील अतिरिक्त होणारे पाणी नदीपात्राद्वारे सोडण्यात येऊ नये. नदीपात्राद्वारे पाणी सोडल्यास प्रकल्पावर असलेले विविध जलाशय पुर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता नाही. त्यामुळेच प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरल्यास कालव्याद्वारे पाणी सोडल्यास लाभक्षेत्रातील विविध जलाशय शंभर टक्के भरून त्याचा फायदा सिंचनासह शेतीसाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे. विशेषतः मांजरा व निम्मन तेरणा प्रकल्पातील अतिरिक्त होणारे पाणी कालव्याद्वारेच सोडणे अत्यंतत गरजेचे आहे. कालव्याद्वारे पाणी सोडल्यास आगामी काळात सिंचन क्षेत्र वाढून पाणीटंचाईही निर्माण होणार नाही. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी तात्काळ संबंधीताना सुचना देऊन योग्य कार्यवाही करावी अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे पत्राद्वारे केली आहे. विशेषतः ही बाब मसलगा, साकोळ, व्हटी व घरणी आदी मध्यम प्रकल्पावर अवलंबणे अत्यंत आवश्यक असल्याचेही या पत्रात आ. निलंगेकरांनी नमुद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here