*आमदार निलंगेकर यांनी घेतलीपदयात्रींची भेट*

0
353

शेतकर्‍यांच्या न्यायहक्कासाठी औसा-तुळजापूर पदयाञेसाठी आ.अभिमन्यु पवार यांची उजनी मुक्कामी  आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी घेतली भेट

निलंगा,-( प्रशांत साळुंके )- अतिवृृृष्टी आणि पुरपरिस्थितीच्या अनुषंगाने शेतकर्‍यांचे खरीप पिकातील पीकांचे अतोनात नुकसान झाल्याने महाविकास आघाडीला जागे करण्यासाठी शेतकरी बांधवांसोबत आ.अभिमन्यु पवार यांनी औसा ते तुळजापूर पदयाञा काढली असल्याने त्यांचा मुक्काम उजनी याठिकाणी माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी भेट घेऊन शेतकरी बांधवांना न्यायहक्कासाठी आ.अभिमन्यु पवार यांना पदयाञेस पाठींबा असल्याचे सांगितले आहे.

शेतकरी बांधवांचे म्हणणे प्रभावीपणे सरकारपर्यंत पोहोचावे यासाठी विविध उपक्रम घेणे आवश्यक आहे. सरकारने जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी आहे, शेतकरी बांधवांना न्याय्य हक्क मिळवून देऊन थेट त्यांच्यापर्यंत मदत पोहोचेपर्यंत आपल्या संघर्षाची धार कमी होऊ न देणे आवश्यक वाटते असल्याचे माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी यावेळी सांगितले.

या पदयात्रेच्या माध्यमातून आई तुळजाभवानीला “सरकारला सध्दबुध्दी” मिळण्यासाठी साकडे घातले जाणार आहे. किमान त्यानंतर तरी शेतकरी बांधवांची परिस्थिती राज्य सरकारला कळेल हीच एकमेव आशा असल्याचे माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधताना म्हणाले.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, बापूसाहेब राठोड , किरण उटगे आदींची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here