21.8 C
Pune
Sunday, March 22, 2026
Homeलेखउद्ध्वस्त 'मद्य'...पी 'राष्ट्र'... म्हणजे महाराष्ट्र..!

उद्ध्वस्त ‘मद्य’…पी ‘राष्ट्र’… म्हणजे महाराष्ट्र..!

फीचर

” मदिरा ” च्या व्यसनांनी अनेक मंदिरा सारखी असलेले सुसंस्कृत घरे व्यसनांधिंन होऊन उठत असतांना दिसत आहेत या व्यसनाच्या झळा पोहचणाऱ्या प्रत्येक कुटुंबातील मायमाऊली ला विचारा एखाद्या मद्य पी कुटूंब प्रमुखाचा किंवा एखाद्या स्वतः च्या मुलांचा त्रास काय ? आहे त्यांचे कुटुंबावर होणारे गंभीर परिणाम व्यसनामुळे पतीचा मृत्यू त्यामुळे आलेले विधवेपण या मरत यातना भोगणाऱ्या महिलांचा हा काही तरी विचार करणार आहे किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे
सर्व कुटुंबातील महिला आपल्या कुटूंबाला व्यसनमुक्त करण्यासाठी दारू बंदी करा म्हणून सर्व ठिकाणी आंदोलन होत असताना यांचे काहीच गांभीर्य लक्षात न घेता केवळ शासनाला
या व्यवसायातून महसूल सर्वाधिक मिळतो म्हणून महाराष्ट्राची ओळख एक उद्धस्त मद्य “पी ” महाराष्ट्र अशीच करायची आहे काय ? कोणतेही बाबतीत निर्णय घेण्याबाबत ” सरकारचे डोके ठिकान्यावर आहे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


आज महाराष्ट्रात अनेक कुटूंब व्यसनाधीन होऊन मरत यातना भोगत असताना अनधिकृत किंवा अधिकृत विक्री केली जाणारी व एका विशिष्ट प्रकारच्या ठिकाणी अधिकृत किंवा चोरून मिळणारी वाईन आत्ता सरकार अधिकृत करून सार्वत्रिक ठिकाणी म्हणजे सुपर मार्केट मध्ये किराणा दुकान येथे उपलब्ध करून देण्याचा निर्णय महविकास आघाडी सरकारने घेतला आहे हा निर्णय म्हणजे अनेक कुटूंबाच्या दुःखावर मिठ चोळणारा आहे हा निर्णय कितपत योग्य त्या सरकारला माहिती ! अश्या वाईट गोष्टीना प्रेरणा देणाऱ्या लोकशाही च्या पडद्याअडुन लोकांच्या विरोधात निर्णय घेणाऱ्या लोकप्रतिनिधी च्या विरोधात ” महाराष्ट्र सरकार मै बैठे हुये गद्दारो को जुते मारो सालो को ” असा आवाज महिलातून दबक्या आवाजात येताना दिसत असून एक दिवस यांचा मोठा उद्रेक होऊन एवढे मोठे आंदोलन होईल याला सर्वस्वी जबाबदार सरकार राहील
आपली भूमी साधू संतांची महंतांचीभूमी आहे त्यांनी आपणांस आदर्श आचार संहिता घालून दिली संस्कार देऊन गेलेत महात्मा गौतम बुद्ध आपल्या पंचशील त्रिशरणात म्हणतात ” मी दारू पिणार नाही खोट बोणार नाही व्यभिचार करणार नाही या आदर्शच्या विचाराचे पालन करणार आहोत काय बुद्ध ,बसवेश्वर, कबीर या महापुरुष यांचे विचार म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली आदर्श भारतीय राज्यघटना आहे या राज्य घटनेचा लोकप्रतिनिधीना विसर तर पडला नाही का ? .

या लोकशाहीत राक्षसी प्रवृत्ती नेमकी अली कोठून असे निर्णय कोनाच्या अकलेचेकांदे तोडणारे असावेत हा निर्णय म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला व्यसनाधीन करणे संपूर्ण महाराष्ट्रात अराजकता माजविणे ,व्यभिचार, बलात्कार, गुंडगिरी, हाणामाऱ्या या सर्व गोष्टींना आमंत्रण म्हणजे वाईन सुपरमार्केट मध्ये दिली जाणारी परवानगी होय असे निर्णय विचारपूर्वक घेणे योग्य वाटते साधू संतांची थोर महापुरुष, यांची क्रांतिकारी शूरवीर लोकांची पावन भूमीला कलंकित करून उध्वस्त मद्य पी महाराष्ट्र बनवू नका नाहीतर नक्कीच…. महिला शक्ती रस्त्यावर उतरेल यात शंका नाही….!


गिरीधर गायकवाड नागराळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]