हनुमान खांडसरी व अग्रवाल परिवाराच्या वतीने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण..!
निलंगा,-(प्रशांत साळुंके)-निलंगा तालुक्यातील हलगरा येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटमुळे येथील स्थानिक नागरिकांना येणाऱ्या काळात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही असा विश्वास वाटतो असे माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे. असे दुःख इतरांच्या वाटेत येऊ नये म्हणुन त्यांनी ऑक्सिजन प्लांटची उभारणी करून रुग्णांना नवसंजीवनी देण्याचे कार्य केले आहे असेही माजी पालकमंञी तथा आ.निलंगेकर यांनी केले.

याप्रसंगी खासदार सुधाकर शृंगारे, अशोक अग्रवाल, मुख्य अभियंता आर.के.जाधव, कृषी अधिकारी घोरपडे ,जिल्हा परिषद कृषी सभापती गोविंद चिलकुरे, चेअरमन दगडू साळुंके, संघटन सरचिटणीस संजय दोरवे, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिलीप सौंदाळे व स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती.












