काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव अभय साळुंकेच्या पाठपुराव्याला यश
औराद शहाजानीची 17 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर
काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पेढे वाटप करीत केला जल्लोष
औरादचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटणार : मोहन भंडारे
निलंगा,- (प्रशांत साळुंके)- औराद ( शहाजानी) येथील लोकसंख्येत भरमसाठ वाढ झाल्याने पाणी प्रश्न भेडसावत होता. विशेष म्हणजे तेरणा काढावर हे शहर वसलेले असतानाही येथील पाणीपुरवठा योजना जुनी असल्याने ती तोकडी पडत होती म्हणून ही १७ कोटीची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर औरादकरांचा पणी प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याचे काँग्रेसचे जेष्ट नेते मोहनराव भंडारे म्हणाले.
तालुक्यातील औराद (शहाजानी) येथील गत दहावर्षांपासून बहुप्रतिक्षेत असलेली पाणीपुरवठा योजना पालकमंत्री अमित विलासराव देशमुख , पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व राज्यमंञी संजय बनसोडे यांनी १७.५० कोटी रुपयांची मंजूर केल्याने येथील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात फटाके वाजवून पेढे वाटप करीत आनंदोत्सव साजरा केला.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे सन १९७० साली त्यावेळेची लोकसंख्या गृहीत धरून जलकुंभ उभारण्यात आला होता. मात्र, सद्यस्थितीत औराद शहाजानीच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. यामुळे पाणीपुरवठा योजना हा औरादकरांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न होता. गत दहा वर्षांपासून ही पाणीपुरवठा योजना प्रतिक्षेत होती.
या पाणीपुरवठा योजनेकरिता काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केला होता.यामुळे औरादचा पाणी प्रश्न मिटणार आहे. शिवाय ही वार्ता कळताच येथील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके उडवून पेढे वाटप करीत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी उपसरपंच भंडारे महेश, बालाजी भंडारे, रवींद्र गायकवाड, जीवन कांबळे, गफार मोबिन, किरण रेड्डी, सचिन जाधव, विशाल सगरे, विठठल पाटील, शाम पाटील, अभिषेक बिरादार, विलास कांबळे, बक्षू मुल्ला, अतूल भंडारे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











