औशात क्रीडा संकुल उभारणार

0
341

रुस्तम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांच्या नावे औशात क्रीडा संकुल उभारणार – आ. अभिमन्यू पवार 

निलंगा, -( प्रशांत साळुंके )- रामलिंग मुदगडला लाल मातीतील कुस्ती पंढरीच दर्जा मिळवून देणारे लाल मातीतील बादशाह रुस्तम ए हिंद पैलवान हरिश्चंद्र बिराजदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ औसा येथे उभारण्यात येणाऱ्या क्रीडा संकुलाल हरिश्चंद्र बिराजदार यांचे नाव देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आ. अभिमन्यू पवार यांनी केले आहे.

लातूर चे भूषण, रुस्तम ए हिंद, पैलवान स्व हरिश्चंद्रमामा बिराजदार यांच्या पुण्यतिथीनिमित्त रामलिंग मुदगड (ता. निलंगा) येथे दि.२२ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हरिश्चंद्र बिराजदार यांनी अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचा पद्म पुरस्काराने सन्मान व्हावा व त्यांच्या नावे मतदारसंघात १ भव्य क्रीडासंकुल उभारावे ही २ स्वप्ने आहेत. क्रीडा संकुलाचा प्रस्ताव अंतिम टप्यात असताना काही कारणांमुळे लांबला आहे तर पद्म पुरस्कारासाठी मागच्या वर्षी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पत्रव्यवहार केला होता. हे दोन्ही विषय पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी माझी असून त्यासाठी येत्या काळात पाठपुरावा करणार आहे असे मनोगत यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला  सोमलिंग दुधनाळे, माजी पं स सभापती  अजित माने, शिक्षण संस्था सचिव  राहुल बिराजदार, संचालक  राजेंद्र गोरे, ज्येष्ठ नेते सुशीलदादा बाजपाई, भाजप औसा तालुकाध्यक्ष  सुभाष जाधव, जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, मंडळाध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, प्रा भीमाशंकर राचट्टे, पं स सदस्य जिलानी बागवान, नितीन पाटील, सौ कल्पनाताई ढबीले, संजय कुलकर्णी,  धनराज होळकुंदे, सरपंच रामलिंग होगाडे, परमेश्वर बिराजदार, बालाजी बिराजदार, पंडित फुलसुरे, भास्कर पाटील, तुकाराम सोळुंके, प्रतीक पाटील, सचिन अनसारवाडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here