27.9 C
Pune
Friday, February 13, 2026
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*गंगापूर गावाला ४ कोटी ९५ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर*

*गंगापूर गावाला ४ कोटी ९५ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर*

लातूर ; दि. १६ (प्रतिनिधी )-–गंगापूर गावाकरीता सेप्रेट तावरजा प्रकल्पांवरून पाईपलाईन व अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असुन गेले अनेक दिवस याकरता ग्रामस्थांकडून आग्रही मागणी होत होती. ग्रामपंचायत गंगापुर सरपंच बाबु हणमंतराव खंदाडे यानी गेली चार वर्षा पासुन सातत्याने यासाठी पाठपुरावा केला.

मागे १५ ते २० वर्षांपूर्वी ही योजना झाली होती म्हणुन नवीन योजना मंजुरी मिळत नव्हती, तत्कालीन काळात झालेली योजना निकृष्ट कशी झाली होती हे पटवून देऊन नवीन योजना मंजुर करुन घेतली. गावात येणारे व अंतर्गत पाईपलाईन चे सर्वेक्षण हे स्वःतचे १ लाख रुपये घालुन केले, तावरजा ते गंगापुर नवीन पाईपलाईन, अंतर्गत गावात पाणीपुरवठा पाईपलाईन, नवीन फ्लीटर व नवीन पाण्याची टाकी याचा योजनेत समावेश आहे.
पुर्वी गावात वेगवेगळ्या भागात २७ वॅाल्ह वरुन पाणी द्यावे लागत होते, तो पाणीपुरवठा करायला ८ ते १० दिवस लागत होते.
आता नवीन अंतर्गत पाईप लाईन केल्यावर पुर्ण गाव फक्त ५ ते ७ वॅाल्ह वर येणार आहे व २ ते ३ दिवसाआड गावास पाणीपुरवठा करता येणार आहे. हया योजनेत गुणवत्तापुर्ण काम होईल याची दक्षता घेतली जाणार आहे.


केन्द्र सरकारच्या जलजिवन मिशन अंतर्गत ही योजना मंजुर असुन आदरणीय पंतप्रधान नरेद्रं मोदी यांचे मनःपुर्वक आभार.
सदर योजना मंजुर करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस , माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर , आमदार अभिमन्यु पवार व आमदार रमेशअप्पा कराड यांनी मदत केली त्यामुळे त्यांचे ही मनःपुर्वक आभार ग्रामस्थ गंगापुर व ग्रामपंचायत गंगापुर यांनी व्यक्त केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]