28.4 C
Pune
Wednesday, April 8, 2026
Homeराजकीयधिरज देशमुख यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

धिरज देशमुख यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

लातूर;(प्रतिनिधी) लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार तथा युवा नेते धिरज विलासराव देशमुख यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. यानिमित्त आधी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

लातूर ग्रामीण मतदारसंघाचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मुरुड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये 720 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.पक्ष नेतृत्वाचा वाढदिवस हा समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन साजरा करावा असा मानस ठेवून मुरुड शहर काँग्रेसच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

या अंतर्गत मुरुड येथील जिल्हा परिषद विभागाच्या प्रशाला मधील 720 विद्यार्थ्यांना टिफीन बॉक्स चे वितरित करण्यात आले.विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक वृंद यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.यावेळी मुरुड शहर काँग्रेसचे अध्यक्ष दिपक पटाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डॉ.दिनेश नवगिरे , मुरुड शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश फेरे , ईश्वरप्रसाद चांडक, ग्रामपंचायत सदस्य अनंत कणसे, संजय अंधारे, माजी सरपंच राजेंद्र मस्के, प्रभू देवकर, शामराव इटकर, दिलीप इटकर, अमोल गाडे, शरीफज सय्यद, जगन चव्हाण, उत्तम चव्हाण, शेतकरी सेलचे रामानंद जाधव, महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सारिका फेरे, राणी खोडसे तसेच मुरुड शहर युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष मुकेश बाबा सवासे,युवक कार्याध्यक्ष प्रशांत पिंपरे ,सुरज कांबळे , मोसिन मणियार , चैतन्य पटाडे, समाधान गायकवाड, बालाजी सवासे, बिलाल बागवान ,गणेश जाडकर, आकाश देडे, प्रसिद्धी प्रमुख अजय भोसले, विनोद पुदाले,सय्यद सुभान, यश सुरवसे, दादा वाघ, इत्यादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]