नेत्र तपासणी शिबीर

0
411

माझं लातूर परिवाराच्या वतीने आयोजित नेत्रतपासणी शिबिरास  प्रतिसाद… 

लातूर,-( प्रतिनिधी )-माझं लातूर परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा मोठा पाऊस चालू असतानाही प्रतिसाद लाभला .या शिबिराचे उद्घाटन साई फाउंडेशन च्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील चाकूरकर लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लातूर महानगरपालिकेचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नेत्र विभाग प्रमुख डॉक्टर उदय मोहिते यांची उपस्थिती होती.

विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या माझं लातूर परिवारने गत दोन वर्षा पासून लातूर शहरात विविध जन हिताचे उपक्रम हाती घेतले आहेत, याचाच एक भाग म्हणून शिवछत्रपती ग्रंथालय,लातूर येथे नेत्र तपासणी शिबिराचे असयोजन करण्यात आले, माझे लातूर व्हाट्सअप परिवार सदस्यांकडून तपासणी पूर्व नोंदणी करण्यात आली होती. माझे लातूर व्हाट्सअप परिवार च्या सदस्यांनी राबविलेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या शिबिरासाठी माझे लातूर परिवाराचे अभय मिरजकर ,सतीश तांदळे, दिपरत्न निलंगेकर ,ऍड. प्रदीप मोरे प्रमोद गुडे, डॉ सीतम सोनवणे,तम्मा पावले, आप्पा बळवंते, राहुल मातोळकर ,राजेश तांदळे , गोपाळ झंवर , युवराज कांबळे,रत्नाकर निलंगेकर , विनोद कांबळे,आशा आयाचीत ,सचिन अंकुलगे ,सुनील गवळी , श्रीराम जाधव,उमेश कांबळे ,मासूम खान,किशोर जैन,इम्रान नाईकवाडे,प्रशांत साळुंके यांनी पुढाकार घेतला होता.

माझं लातूर परिवाच्या माध्यमातून कोरोना कालावधीमधील जी मदत सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.त्याचअनुषंगाने एकूण 311 रूग्णांची नेञ तपासणी करण्यात आली आहे.त्यात,83 रूग्णांवर मोतीबिंदू असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्याच्यावर लातूरच्या विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयांच्या सर्वोपचार रूग्णालयात मोफत मोतीबिंदू शस्ञक्रिया करण्यात आल्याचे समजते आहे.माझं लातूर परिवाराचे अनेक स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here