विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,प्रविण दरेकर यांचा..
लातूर जिल्हा अतिवृष्टी पुरस्थिती पाहणी दौरा…
लातूर,- अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीमुळे लातूर जिल्हयात अतोनात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविणजी दरेकर हे ३ आणि ४ ऑक्टोबर २०२१ रोजी लातूर जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी दिली आहे.

गेल्या आठवडयात प्रचंड मोठा पाऊस होवून लातूर जिल्हयातील खरीप हंगामातील सर्वच पिकाचे अतोनात नुकसान झाले तर जलासाठयातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नद्यांना महापूर येवून नदीकाठच्या उभ्या पिकासह शेतजमीनी वाहून गेल्या. अनेक शेतकऱ्यांचे पशुधन या पुरपरिस्थितीमूळे दगावले. एकुणच जिल्हाभरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त असून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.
अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीच्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीत आलेल्या लातूर जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी ३ आणि ४ ऑक्टोबर २०२१ रोजी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविणजी दरेकर हे लातूर जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा दि. ३ ऑक्टोबर रविवार रोजी सायंकाळी ३.५५ वा. वांजरवाडा ता. जळकोट, सायं.४.१० वा. हाडोळती ता. अहमदपूर, सायं ५ वा. घरणी ता. चाकूर, सायं ५.३० वा. भातखेडा ता. लातूर सायं. ७ वा. पत्रकार परिषद आणि ४ ऑक्टोबर सोमवार रोजी सकाळी ८.३० वा. भुसणी शिवणी ता. औसा, सकाळी ९.१५ वा. गौर मसलगा ता. निलंगा, सकाळी १०.०० वा. औराद शहजनी सकाळी ११.०० वा. मदनसुरी, सकाळी ११.३० वा. कोकळगाव ता. निलंगा, दुपारी १२.२० वा. उजणी ता. औसा येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करणार आहेत अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी दिली आहे.

या दौऱ्यात माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड, खा. सुधाकर शृंगारे, आ. अभिमन्यू पवार, भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, अनु. जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, किसान मोर्चाचे शिवाजीराव पाटील कव्हेकर, प्रदेश भाजपाचे गोविंदअण्णा केंद्रे, शैलेश लाहोटी, माजी आमदार पाशा पटेल, बब्रूवान खंदाडे, जिप अध्यक्ष राहूल केंद्रे, लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, यांच्यासह भाजपाचे आजी माजी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.











