पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ,सबका विकास, सबका विश्वास’ या संकल्पनेस प्रतिसाद
निलंगा,-( प्रतिनिधी )-
देशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवत मतदारांनी पाच पैकी चार राज्यात घवघवीत यश प्राप्त करून दिले.या निकालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास या नार्यावर मतदारांनी पुन्हा एकदा कौल दिला आहे. त्याचबरोबर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात पुन्हा एकदा चमत्कार घडवत तेथे पक्षाला बहुमत प्राप्त करुन दिले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी इतिहास घडविलेला असून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार करून दाखविलेला आहे.या निवडणूकीच्या विजयात ज्यांनी-ज्यांनी योगदान दिले त्यांचे अभिनंदन.या निकालामुळे देशातील जनता पुन्हा एकदा भाजपाच्या पाठिशी असल्याचे सिद्ध झाले आहे,अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.