लातूर ; ( प्रतिनिधी ) –
सांस्कृतिक मंत्रालय व शिक्षा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने नववी ते बारावी शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कला उत्सवामधून शास्त्रीय गायन या कलाप्रकारासाठी लातूरच्या देशी केंद्र विद्यालयाची सायली सुनील टाक ची निवड झाली आहे, नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय कलाउत्सवांमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध भागांमधून शेकडो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता या सर्वांमधून आपल्या भक्कम रियाजाच्या व अनुवंशिकतेच्या बळावर सायलीने हे लक्षवेधी यश संपादन केले आहे, या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सायलीने यमन रागातील तीन तालात निबद्ध छोटा ख्याल *एरी आली पिया बिन* ही बंदिश बहारदार पणे सादर करून आपल्या आक्रमक गायकीची चुणूक दाखवली.

सायलीला या अगोदरही शास्त्रीय उपशास्त्रीय व सुगम गायनामध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत, विशेष म्हणजे 2021-22 या वर्षासाठीची केंद्र शासनाच्या वतीने दिली जाणारी सी.सी. आर. टी. स्कॉलरशिप तिला शास्त्रीय गायनामध्ये प्राप्त झाली आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या स्टार प्रवाह वाहिनी वरील रियालिटी शो मध्ये मी होणार महाराष्ट्राचा सुपरस्टार छोटे ऊस्ताद यामध्ये सायली विजेती ठरली आहे, भुवनेश्वर येथे जानेवारी 2023 मध्ये राष्ट्रीय पातळीवरील कला उत्सव स्पर्धा संपन्न होणार आहे यामध्येही सायली आपल्या गायकीची चुणूक दाखवून सर्वांमध्ये अव्वल ठरेल हीच सर्वांची अपेक्षा आहे, या तिच्या यशाबद्दल देशी केंद्र विद्यालयातील सर्व स्टाफ च्या वतीने तसेच आरोह व आवर्तन परिवाराच्या वतीने तसेच संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या कडून सायलीचे व तिच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले जात आहे,