22.9 C
Pune
Tuesday, March 31, 2026
Homeठळक बातम्या*माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकराकडुन पुरोहित परिवाराचे सांत्‍वन*

*माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकराकडुन पुरोहित परिवाराचे सांत्‍वन*

अद्ययावत विज्ञान केंद्राचे प्राचार्य पुरोहित सरांचे स्वप्न साकार करणार…!’

लातूर प्रतिनिधी:- लातूराच्‍या शैक्षणीक क्षेत्रातील अग्रगण्‍य व्‍यक्‍तीमत्‍व व दयानंद महाविदयालयाचे माजी प्राचार्य कन्‍हैयालाल पुरोहित यांचे नुकतेच वृध्‍दापकाळाने नुकतेच निधन झाले. त्‍यामुळे माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी पुरोहित केशरिया निवासस्‍थानी भेट देवून त्‍यांच्‍या परिवाराचे सात्‍वंन केले.

माजी प्राचार्य पुरोहित यांच्‍या प्रतिमेस पुष्‍प अर्पण करून त्‍यांना श्रध्‍दांजली अर्पण केली. यावेळी आ.निलंगेकर यांनी सर्व सोयींनी युक्त अशा अद्ययावत लातूर विज्ञान केंद्राची लवकरात लवकर उभारणी केले जाईल यासाठी प्रयत्न करू व खर्‍या अर्थाने हिच दिवंगत प्राचार्य कन्हैयालाल पुरोहित सरांना आदरांजली असेल अशी भावना व्‍यक्‍त केली.

प्राचार्य कन्हैयालाल पुरोहित सरांची शिक्षण व विज्ञानाप्रति समर्पण भावना होती. सतत विद्यार्थ्यांना प्रेरक कार्यात ते व्यस्त असत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लातुरात अद्ययावत विज्ञान केंद्र उभारले जावे, या तळमळीतून सरांनी या विषयाचा पाठपुरावा केला. मंत्री पदाच्या कार्यकाळात हा विषय मार्गी लावण्यात यश आले. मात्र सरांच्या हयातीत विज्ञान केंद्राचे कार्य तडीस गेले नाही. यापुढील काळात लवकरात लवकर लातुरात अद्ययावत विज्ञान केंद्र उभारले जाऊन दिवंगत प्राचार्य कन्हैयालाल पुरोहित सरांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबद्ध राहू, असा निर्धार माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला.

यावेळी कोलीन पुरोहित, रोहित पुरोहित, चंद्रकांत पुरोहित, जावई सुमनकुमारजी जोशी, अमोल गोवंडे, शेषराव ममाळे होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]