म्यासिकॉंन 2023 च्या निमित्ताने होणारी कॉन्फरन्स
वैद्यकीय सेवेचे केंद्र म्हणून विकसित होत
असलेल्या लातूरला पर्वणीच ठरणार
लातुरात तीन दिवसीय ४५ वी म्यासिकॉन वार्षिक कॉन्फरन्सचा
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ
लातूर प्रतिनिधी : गुरूवार दि १ फेब्रुवारी
म्यासिकॉंन 2023 च्या निमित्ताने होणारी ही कॉन्फरन्स वैद्यकीय सेवेचे केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या लातूरला पर्वणीच ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त करून, लातूर आणि परिसरातील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांवर तज्ञ शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया होऊन त्यांना चांगले आरोग्य मिळेल, त्याचबरोबर चर्चासत्रातून अद्ययावत ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आदान प्रदान होणार असल्यामुळे नव्याने या क्षेत्रात आलेले डॉक्टर, तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या येथील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे असे शुभारंभ प्रसंगी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.

राज्यातील नामांकीत सर्जन आणि लातूर म्यासिकॉंनच्या वतीने लातूरच्या ग्रँड हयात हॉटेल या ठिकाणी गुरुवार दि. २ फेब्रुवारी २०२३ रोजी ४५ व्या तीन दिवसीय वार्षिक कॉन्फरन्सचा शुभारंभ राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते राज्यातील नामांकित सर्जन यांच्या उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात मंगल स्तवन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली. लातूर म्यासिकॉन २०२३ कॉन्फरन्स वेळी असोसिएशन करीता उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या डॉ. अजय पुनपाळे, डॉ. दिनकर काळे, डॉ. प्रांजली डबले, डॉ. समीर रेगे, डॉ.राजेंद्र शिंदे यांना प्रमाणपत्र देऊन अध्यक्ष डॉ. संजय कुमार जैन यांच्या हस्ते गौरविण्यात आले. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी जॉनसन अँड जॉनसन इन्स्टिटय़ूट च्या लेप्रोस्कोपी व इतर शस्त्रक्रिया माहिती देणारी डेमो व्हॅनची पाहणी केली.

यावेळी दिनकर काळे, डॉ.उदय मोहिते, डॉ.प्रताप भोसले, डॉ.संजीवकुमार जैन, डॉ.अजय पुनपाळे, डॉ.राजेंद्र शिंदे, डॉ.एस.एन.जटाळ, डॉ.संजय वारद, डॉ.दीपक गुगळे, डॉ.ऋजुजा अयाचित, डॉ.पल्लोड यांच्यसह राज्यभरातून तज्ञ सर्जन उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, या कॉन्फरन्सची सुरुवात १५ वर्षापूर्वी ज्या वेळी झाली त्या वेळी लोकनेते विलासराव देशमुख यांची उपस्थिती होती आणि आज ४५ व्या कॉन्फरन्स करीता माझी प्रमुख उपस्थिती हा एक दुर्मिळ योग म्हणावा लागेल. मी या कॉन्फरन्सला एक राजकारणी म्हणून नाही तर एक लातूरकर म्हणून उपस्थित झालोय. लातूर या ठिकाणी अशी राज्यस्तरीय ३ दिवसीय म्यासिकॉन कॉन्फरन्स होत आहे याचा मनस्वी आनंद होत असून लातूरला सर्वच क्षेत्रात पुढे आणण्याचे स्वप्न आदरणीय लोकनेते विलासराव यांनी पाहिले होते ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण सर्व एकत्रित मिळून करीत आहोत. ज्यामुळे आज लातूरचा शिक्षणातील पॅटर्न सर्वश्रुत आहे. मागील काळात आपण कोविड १९ सारख्या महामारीला सामोरे गेलो. या वेळी सरकारसह वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच इतरही क्षेत्रातील सर्वांनी एकत्रित येऊन एक भारताचा नागरिक म्हणून आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले व आपण या महामारीचा मुकाबला करू शकलो याचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. लातूर मध्ये आज असलेल्या शैक्षणिक संस्था, व्यापार, सहकार, वैद्यकीय क्षेत्र यासह सर्वच क्षेत्राची वाढ होत असून यासाठी तमाम लातूरकर आणिआपल्या सर्वांचे योगदान लाभलेले आहे हे देखील आवर्जून सांगावे लागेल असे म्हणत या तीन दिवसीय लातूर म्यासीकॉन कॉन्फरन्स साठी शुभेच्छा दिल्या.
पूढे बोलतांना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, म्यासिकॉंन 2023 च्या निमित्ताने दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या लातूर आणि परिसरातील रुग्णांवर तज्ञ शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया होऊन त्यांना आराम मिळेल, त्याचबरोबर चर्चासत्रातून अद्ययावत ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आदान प्रदान होणार असल्यामुळे नव्याने या क्षेत्रात आलेले डॉक्टर, तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या येथील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे असे यावेळी बोलतांना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे. यानिमीत्ताने वैद्यकीय सेवेचे केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या लातूरच्या दृष्टीने ही कॉन्फरन्स पर्वणीच ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त करून, कॉन्फरन्स संयोजकांना शुभेच्छा दिल्या. बाहेर ठिकाणाहून आलेल्या सर्व शल्यचिकित्सकांना लातूर येथील निवास सुखदायी राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.

डॉ.संजयकुमार जैन यावेळी बोलताना म्हणाले की, आज या असोसिएशनचे सद्स्य, संबंध देशभरात आहेत याचा मला अभिमान असून मी आज अध्यक्ष आहे तो आपल्या प्रेमामुळे आहे. या असोसिएशनसोबत काम करताना जे समाधान मिळते आहे ते मोजता न येणारे आहे. या असोसिएशचा विस्तार अधिकाधिक व्हावा यासाठी आपण सर्व प्रयत्नरत राहुयात. यावेळी लातूर म्यासिकॉन कडून राज्यातील तज्ञ सर्जन, स्टेट चाप्तर म्हणून गौरविण्यात येणाऱ्या सर्जनच्या वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्याचे कौतुक करीत मान्यवरांच्या हस्ते अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. राजेंद्र शिंदे यांनी लर्न, अनलर्ण आणि रिलर्ण हे ब्रीद घेऊन वाटचाल करीत असलेल्या लातूर म्यासिकॉनची २५ सप्टेंबर १९७५ या स्थापना दिनापासून ते आजतागायत केलेली वाटचाल, ध्येयधोरणे,राज्यातील म्यासिकॉन च्या ४३ शाखा त्यांचे कार्य आणि यांची उद्दिष्ट याबाबत माहिती दिली. प्रारंभी बोलताना डॉ. दिनकर काळे यांनी मनोगत व्यक्त करताना लातूर म्यासिकॉनच्या स्थापनेपासून आजवरच्या कार्याची माहिती उपस्थिताना दिली. तर डॉ.समीर रेगे यांनी लातूर म्यासिकॉनच्या मुख्य उद्देशाची माहिती दिली.
शेवटी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार डॉ. अजय पुनपाळे यांनी मानले.
—————–




