26.8 C
Pune
Tuesday, March 24, 2026
Homeराजकीय*लातूर ग्रामीणमधील १७ कामासाठी २ कोटीचा निधी मंजूर*

*लातूर ग्रामीणमधील १७ कामासाठी २ कोटीचा निधी मंजूर*

भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून पर्यटन विकास अंतर्गत लातूर ग्रामीणमधील १७ कामासाठी २ कोटीचा निधी मंजूर

           लातूर दि. १५– लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील १७ गावातील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून २ कोटी रुपयांचा निधी राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या माध्यमातून मंजूर झाला आहे.

          लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विविध गावच्या पर्यटन स्थळाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राज्याचे पर्यटन विकास मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गिरीशजी महाजन साहेब यांच्याकडे वेळोवेळी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी पाठपुरावा केला होता. केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून लातूर ग्रामीण मतदार संघातील १७ गावातील पर्यटन स्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्याकरिता पर्यटन योजनेअंतर्गत तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे

          राज्याच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील सोनवती ता. लातूर येथे खंडोबा मंदिर परिसर अंतर्गत सुधारणा करणे १० लक्ष, भातखेडा ता. लातूर येथे महादेव मंदिर परीसरात सिमेंट कॉक्रीट रस्‍ता व नाली बांधकाम करणे १५ लक्ष, माणुसमारवाडी ता. रेणापूर येथे बालाजी हनुमान देवस्‍थान सभामंडप बांधकाम व परिसर विकसीत करणे २० लक्ष, चिकलठाणा ता. लातूर येथे बारा इमाम दर्गा परिसरात सोलार विद्युतीकरण करणे १५ लक्ष, बोरी ता. लातूर ऋषिनाथ मंदिर परिसर विकसीत करणे १५ लक्ष, मौजे भातांगळी ता. लातूर येथे विठ्ठल रुक्‍मीणी मंदिर परिसर विकसीत करणे १० लक्ष, चाटा ता. लातूर येथे चंपाबाई महाराज मंदिर परिसर विकसीत करणे १० लक्ष, खंडाळा ता. लातूर येथे अंबाबाई मंदिर परिसर विकसीत करणे १० लक्ष, चिंचोली ब. ता. लातूर येथे काळ भैरवनाथ मंदिराकडे जाणारा पोच रस्‍ता व परिसर विकसीत करणे १० लक्ष, सारसा ता. लातूर येथे गणेशनाथ मंदिर परिसर विकसीत करणे १० लक्ष, निळकंठ ता. लातूर येथे निळकंठेश्‍वर मंदिर सभामंडपातील उर्वरीत बांधकाम व परिसर विकसीत करणे १० लक्ष, मुरुड ता. लातूर येथे दत्‍त मंदिर सभामंडप व परिसर विकसीत करणे १० लक्ष, मसला ता. लातूर येथे विठ्ठल रुक्‍मीणी मंदिर किचन शेड बांधणे व परिसर विकसीत करणे १० लक्ष, मांजरी ता. लातूर येथे जगदंबा देवीचे मंदिर विकसीत करणे १० लक्ष, भिसे वाघोली ता. लातूर येथे हनुमान मंदिर विकसीत करणे १५ लक्ष, दजीबोरगाव ता. रेणापूर येथे चिन्‍मयानंदस्‍वामी महाराज मठ परिसर विकसीत करणे १० लक्ष, कारसा ता. लातूर येथे विठ्ठल रुक्‍मीणी मंदिर परिसर विकसीत करणे १० लक्ष याप्रमाणे निधी मंजूर झाला आहे सदरील निधी मंजूर झाल्याबद्दल आ. रमेशआप्पा कराड यांचे त्या त्या गावातील भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.

          राज्यात मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार साहेब यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून लातूर ग्रामीण मतदार संघातील गावागावात खेड्यापाड्यात शासनाच्या योजनेच्या माध्यमातून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांना विविध विकासाची कामे मंजूर करण्यात आणि त्यासाठी लागणारा कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेण्यात मोठे यश आले आहे यामुळे गावा गावात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात होत असून विकासाला मोठी गती मिळाली आहे. लातूर ग्रामीण मतदार संघातील विविध गावच्या पर्यटन स्थळाचा विकास व्हावा यासाठी अनेक प्रस्ताव पर्यटन विभागाकडे दाखल असून मंजुरी स्तरावर आहेत त्याही उर्वरित कामांना लवकरच मंजुरी मिळणार आहे एकूणच भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड म्हणजे धडाडीचे आमदार कामगिरी दमदार असेच ग्रामीण भागातील जनतेतून बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]