आमदार धिरज विलासराव देशमुख यांचा वाढदिवस विलास कारखान्याच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करुन केला साजरा
लातूर प्रतिनिधी : 6 एप्रिल 2022
लातूर ग्रामीणचे आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विलास सहकारी साखर कारखाना लि. वैशालीनगर, निवळीच्या वतीने सर्व संचालकांच्या उपस्थितीत बुधवार दि. 06 एप्रिल 2022 रोजी कारखाना वसाहत येथील जिल्हा परिषद शाळेत गणवेश वाटप व क्रीडा साहित्यांचे वाटप, निवळी येथील निळकंठेश्वर हॉलीबॉल टीम, शिवनेरी क्रिकेट टीम, शिवशक्ती फुटबॉल टीम यांना क्रीडा साहित्य वाटप, अंगणवाडी कार्यकर्त्यांना साहित्य वाटप आणि मातोश्री वृध्दाश्रम येथे अन्नदान करून उत्साहाने साजरा करण्यात आला.

लातूर ग्रामीणचे आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री नामदार अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. बुधवार दि. 06 एप्रिल 2022 रोजी कारखाना स्थळी कारखाना वसाहत येथील शाळेत गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व क्रीडा साहित्यांचे वाटप, निवळी येथील निळकंठेश्वर हॉलीबॉल टीम, शिवनेरी क्रिकेट टीम, शिवशक्ती फुटबॉल टीम यांना क्रिडा साहित्य वाटप, अंगणवाडी कार्यकर्त्यांना साहित्य वाटप आणि मातोश्री वृध्दाश्रम येथे अन्नदान करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन रविंद्र काळे, संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, युवराज जाधव, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, नारायण पाटील, गोविंद डुरे, बाळासाहेब बिडवे, अनिल पाटील, रंजित पाटील, सूर्यकांत सुडे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने, संजय पाटील खंडापूरकर, कार्यकारी संचालक संजीव देसाई, युनीट-2 चे कार्यकारी संचालक ए.आर.पवार आदी उपस्थित होते.