34.5 C
Pune
Thursday, March 26, 2026
Homeआरोग्य वार्ता*विवेकानंद हॉस्पिटलमध्ये डेंटल व मुख रिहॅबिटेशन विभागाचे उद्घाटन*

*विवेकानंद हॉस्पिटलमध्ये डेंटल व मुख रिहॅबिटेशन विभागाचे उद्घाटन*

विवेकानंद कॅन्सर अँड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक डेंटल व मुख रिहॅबिटेशन विभागाचे उद्घाटन

लातूर (माध्यम वृत्तसेवा):- येथील विवेकानंद कॅन्सर अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नवीन डेंटल व मुख रिहॅबिटेशन विभागाचे उद्घाटन पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे काका यांच्या हस्ते विजयादशमी दिवशी करण्यात आले. या अत्याधुनिक सुविधेमुळे कॅन्सर रुग्णांची सोय होणार आहे.


विवेकानंद कॅन्सर अँड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये विशेषतः मुख कर्करोगग्रस्तांना मुखातील टाळू बसविणे,जबडा बसविणे, मुखकर्करोग शस्त्रक्रिया पश्चात तोंडाच्या जबड्याची हालचाल वाढविणे व इतर दंतोपचार उपलब्ध झाले आहेत.
कार्यक्रमाप्रसंगी रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका डॉ.अरुणा देवधर, प्रशासकीय अधिकारी डॉ. गौरी कुलकर्णी, कॅन्सर तज्ञ डॉ. ब्रिज मोहन झंवर,डॉ.प्रमोद टिके, डॉ,आरती झंवर,डॉ, सुशेन गाजरे, डॉ, पवन खिचडी, डॉ, निर्मला गाजरे व रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]