इचलकरंजी / प्रतिनिधी
विश्व हिंदू परिषद व बजरंग दल इचलकरंजी विभागाच्या वतीने निमशिरगांव येथे वेदखिल्लार गो – शाळेत गायींची विधीवत पुजा – अर्चा करुन गोपाष्टमी उत्सव साजरा करण्यात आला.यानंतर झालेल्या बैठकीत गो रक्षा आणि हिंदू धर्म कार्यासाठी सर्वांनी एकदिलाने कार्यरत रहावे, असे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले.
विश्व हिंदू परिषद व बजरंग दल इचलकरंजी विभागाच्या वतीने
हिंदू बांधवांना संघटीत करुन त्यांच्यामध्ये धर्मनिष्ठा , देशप्रेम ,समाज जागृतीचे कार्य केले जाते.याशिवाय
विविध धार्मिक सण ,उत्सव उत्साहात साजरे करण्यात येतात.याच अनुषंगाने निमशिरगांव येथे वेदखिल्लार गो – शाळेत गायींची विधीवत पुजा – अर्चा करुन त्यांना नैवेद्य खाऊ घालून गोपाष्टमी उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष किशोर मोदी ,विभाग सत्संग प्रमुख पंढरीनाथ ठाणेकर , जिल्हा धर्मयाञा प्रसारक संतोष हत्तीकर ,मठ – मंदिर प्रमुख दत्ता पाटील , बजरंग दल जिल्हा सहसंयोजक जितेंद्र मस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी गो – शाळेचे व्यवस्थापक अनंत कोरांटक यांनी गायींचे धार्मिक महत्व सांगत गो – सेवा करुन पुण्य संपादन करावे, असे आवाहन केले.

यानंतर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाची संयुक्त बैठक घेण्यात आली.यावेळी किशोर मोदी , पंढरीनाथ ठाणेकर यांनी संघटना वाढीसाठी प्रयत्न करतानाच धर्मकार्याचा प्रचार – प्रसार करण्यासाठी एकदिलाने कार्यरत रहावे , असे आवाहन केले.तसेच
अन्य पदाधिकाऱ्यांनी गो – मातेचे व
हिंदू धर्मकार्याचे महत्व सांगून या कार्यात समर्पण सेवाभावाने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.यावेळी जयभिम नगर बजरंग दल शाखेचे गो – रक्षा प्रमुख अनिकेत जाधव यांचा वाढदिवस हिंदु – संस्कृतीप्रमाणे गो मातेच्या सानिध्यात साजरा करण्यात आला.

यावेळी बजरंग दल तालुका संयोजक महेश कोरवी ,शहर सहमंञी सचिन कुरुंदवाडे , बजरंग दल प्रखंड संयोजक सचिन वडर , जिल्हा गो – रक्षा प्रमुख अनिकेत तानुगडे , मारुती शिंगारे , अंकुश दुर्गाडे , सुनील कांदेकर , अतुल तनपुरे , शार्दुल शेटे , महेश भिंगवडे , जयवंत आवळे , संतोष मुळे ,दत्ता शिंदे , उत्तम जाधव , प्रवीण म्हेत्रे , अनिकेत जाधव , आशिष डोईफोडे ,अमर वडर ,अभि सावंत , राहुल जाधव , किरण कोळी , सचिन निकम , गणेश डोंगरे ,प्रशांत जगताप यांच्यासह विश्व हिंदू परिषद – बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.