26.5 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeठळक बातम्या*शालेय साहित्याचे वाटप*

*शालेय साहित्याचे वाटप*

भाजपा युवा नेते ऋषिकेश कराड यांच्या हस्ते 

मसला येथे शालेय साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप

       लातूर दि.१५- भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या जन्मदिन नुकताच झाला. या निमित्ताने लातूर तालुक्यातील मौजे मसला येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आणि पाणी शुद्धीकण यंत्राचा लोकार्पण भाजपाचे युवा नेते   ऋषिकेशदादा कराड यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.

             भाजपाचे कार्यकर्ते रामेश्वर धुमाळ, अशोक सावंत आणि दीपक वागस्कर यांच्या संयुक्त विद्यमाने आ. रमेशआप्पा कराड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मसला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला वह्या, कंपास, पेन यासह इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप भाजपाचे युवा नेते ऋषिकेशदादा कराड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष बन्‍सी भिसे, श्यामसुंदर वाघमारे, भैरवनाथ पिसाळ सरपंच नरेंद्र अल्टे उपसरपंच सुभाष धुमाळ यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

            जिल्हा परिषदेच्या सदस्या मनीषा वाघमारे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या पंधराव्या वित्त आयोगातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभाग्रहात बसवण्यात आलेल्या जल शुद्धी यंत्राचा (आर ओ) लोकार्पण ऋषिकेशदादा कराड यांच्या हस्ते करण्यात आले.

          जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पोपलगर यांनी केले तर शेवटी मुख्याध्यापक श्रीराम कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले याप्रसंगी बाबा भिसे, रामेश्वर पाटील, संजय वागस्कर, शुभम खोसे, गाधवडचे सरपंच क्षिरसागर, मन्मथ धुमाळ, श्रीमंत निलंगे, बिभीषण धुमाळ, सिद्धेश्वर वागंस्कर, संभाजी लोखंडे यांच्यासह गावातील नागरिक शालेय विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]