30.6 C
Pune
Saturday, March 28, 2026
Homeकृषीशेतकरी आर्थिक संकटात

शेतकरी आर्थिक संकटात

पीक विमा योजना

सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या खात्यावर अद्यापही पीक विम्याची रक्कम प्राप्त न झाल्याने सद्यस्थितीला कागदी घोळात अडकला शेतकरी..

पीक विम्याच्या विलंबामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला..

निलंगा,-( प्रशांत साळुंके )-निलंगा तालुकक्यातील असंख्य ज्या शेतकर्‍यांना खात्यावर विम्याची रक्कम जमा झाली नाही,अशा शेतकर्‍यांना विमा कंपनीच्या वतीने विविध प्रकारची जाचक कागदपञे सादर करण्यास सांगितले जात आहे.यामुळे शेतकरी ञस्त झाले असून,जाचक अटीमुळे ते जाम वैतागले आहेत,नुकसान होऊन मोठा कालावधी उलटला आहे.माञ,त्यास अजून किती विलंब लागणार असा सवाल लाभार्थी करत आहेत.कागदपञांची मागणी पाहता शेतकर्‍यांचा विमा कागदी घोळात तर अटकला नाही ना ? असा प्रश्न गावा-गावात चर्चिला जात आहे.
अतिवृृष्टीमध्ये झालेल्या पीकाची नुकसान भरपाई म्हणून तालुक्यातील अर्ध्या शेतकर्‍यांना प्रधानमंञी पीकविमा मिळाला खरा माञ,अर्ध्या शेतकर्‍यांना अद्यापही खात्यावर जमा रक्कम पडली नाही.त्यामुळे विमा कंपनीच्या वतीने शेतकर्‍यांना तक्रारी अर्ज करण्यास सांगण्यात येत आहे.यापूर्वी,शेतकर्‍यांनी बँकेत आँनलाईन तसेच आँफलाईन विमा भरला.त्यानंतर तालुक्यातील सर्वच गावा-गावांमध्ये अर्ध्या शेतकर्‍यांना विम्याची रक्कम खात्यावर जमा झाली.माञ,इतर शेतकर्‍यांना त्याची रक्कम मिळाली नाही.त्यामुळे शेतकर्‍यांनी विमा कंपनाली संपर्क केला.तेव्हा कंपनीच्या वतीने गावातच ग्रामपंचायत कार्यालयात अर्जासोबत संबंधित पीकविमा भरलेली पावती तसेच,आधार कार्ड व बँक पासबुक झेराॅक्स जमा करण्यास सांगण्यात आले होते.या घटनेला तब्बल दोन महिन्याचा कालावधी उलटला आहे.माञ,विम्याची रक्कम शेतकर्‍यांना प्राप्त झाली नसल्याने आता विमा कंपनीने दुसर्‍यांदा तक्रारी अर्ज विहीत नमुन्यात सादर करण्यास सांगितले आहे.त्यामुळे अनेक जाचक कागदपञांचा समावेश त्यात आहे.ज्यामुळे शेतकर्‍यांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड बसणार आहे.तालुक्याच्या ठिकाणी जाऊन विमा कंपनीच्या कार्यालयात ही तक्रारी अर्ज सादर करावे लागत आहेत.ज्यामुळे शेतकरी या कागदी घोळामुळे वैतागून गेला आहे.अतिवृृृष्टीमुळे पीकांचे मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याने नुकसानीची भरपाई म्हणून अर्ध्या शेतकर्‍यांना पीकविमा मिळाला आहे.माञ,अद्यापही अर्ध्या पाञ शेतकर्‍यांना विम्याचा लाभ मिळाला नसल्यामुळे ज्यांना विमा मिळाला नाही,ते शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहैत.हा दुजाभाव का ? असा सवालही विचारत आहेत.

———————————————————————
निलंगा तालुक्यातील पंधरा दिवसांपासून शेतकर्‍यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम पडायला सुरूवात झाली आहे.अनेकांनी रक्कम उचलली आहे.माञ,तालुक्यातील अर्ध्या शेतकर्‍यांना अद्यापही लाभ मिळाला नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.दरम्यान,शेतकर्‍यांकडून तीन-तीन वेळा जाचक कागदपञे घेण्याचे कारण काय आणि ते घेऊनही विम्याची रक्कम खात्यात जमा होत नसल्यामुळे या कागदी घोळाने शेतकरी माञ वैतागला आहे.
———————————————————————
सद्यस्थितीला अनेक गावा-गावात लालपरी येत नसल्याने निलंगा येथे शेतकर्‍यांच्या जाचक तटीनुसार कागदी घोळ जमा करण्यासाठी आवक-जावक करावे लागते.माञ, शेतकर्‍यांची निव्वळ हेलसांड चालू असल्याने निदर्शनात येत आहे.यामुळ तात्काळ अर्ध्या गावातील शेतकर्‍यांना पीक विमा प्राप्त करून देण्यासाठी कांही शेतकर्‍यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.म्हणून लालपरीही यारस्त्यावरून धावणेआवश्यक असल्याचे शेतकरी बोलत आहेत.
———————————————————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]