श्री गुरुजी आयटीआय प्रशिक्षण संस्थेस प्रात्यक्षिक परिक्षा केंद्रास शासनाची मान्यता
श्री गुरूजी आय टी आयच्या शिरपेचात मानाचा तुरा
लातूर ; दि. 23 (माध्यम वृत्तसेवा) लातूर येथील श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थे प्रात्यक्ष प्रात्यक्षिक परीक्षा केंद्रात शासनाने मान्यता दिली आहे याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे श्री गुरुजीच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याची प्रतिक्रिया संस्था अध्यक्ष अभियंता अतुल ठोंबरे यांनी व्यक्त केली आहे.
श्री गुरुजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने प्रात्यक्षिक परीक्षा केंद्र मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता; त्यावर शासनाच्या वतीने विविध स्तरांवर संस्थेचे परिक्षण करण्यात आले. जागा, इमारत, मशिनरी, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी,त्यांचे शिक्षण अनुभव मागील पाच वर्षांचे निकाल , शासनाच्या वतीने आँनलाईने परिक्षण करुन दिलेले ग्र् ग्शरेडीग विद्यार्थी सख्या, विद्यार्थी पूरक राबविलेले उपक्रम यांची सखोल पाहणी करुन व गुणवत्तेची सत्यता पडताळुन पाहण्यात आली .

सर्व निकषात प्रात्यक्षिक परिक्षा केंद्र मंजुरीसाठी शासनाच्या अटी व शर्तीत श्री गुरूजीऔद्योगिक प्रशिक्षण संस्था बसत असल्यामुळे शासनाच्या वतीने श्री गुरूजी औद्योगीक प्रशिक्षण संस्था, लातूरचा प्रात्यक्षिक परिक्षा केंद्र मंजुरीचा प्रस्ताव मंजुर करण्यात ॴला व श्री गुरूजी औद्योगीक प्रशिक्षण संस्था लातूरला २०२५ या वर्षापासुन प्रात्यक्षिक परिक्षा केंद्रास शासनाने मान्यता दिली आहे. या बद्दल संस्थेचे अध्यक्ष अतुल ठोंबरे व सर्व संचालक मंडळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , कौशल्य विकास मंत्री मंगल प्रसाद लोढा तसेच जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी औताडे , व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मुंबई, सहसंचालक देवतळे यांचे ॴभार मानले आहेत . मागील पाच वर्षा पासुन श्रो गुरुजी आय टीआय तांत्रीक गुणवत्तेसोबत संस्काराची परंपरा जपत आहे. विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवणारी एकमेव उपक्रमशील ॴय टी आय म्हणुन या संस्थेने नांव लौकीक मिळवला आहे .दररोज प्रार्थने सोबत प्राणायाम ,योगा वर्ग स्वच्छ परीसर, स्वच्छताचे संस्कार दिले जातात .पर्यावरण पुरक कामे वृक्षारोपण ,जल पुनर्भरण या बद्दल व्याख्यानाचेआयोजन करून विद्यार्थ्याना पर्यावरणाचे महत्व सांगितले जाते. विद्यार्थ्याना पुढील आयुष्यात चागला नागरीक होण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन केले जाते.
गुरूजी आय टी आय मध्येELECTICIAN , WIREMAN, WELDER. FITTER, PHYSIOTHERARPY हे अभ्यासक्रम आहेत . मागील पाच वर्षांत हे अभ्यासक्रम पुर्ण करुन शेकडो विद्यार्थी आत्मनिर्भर झाले आहेत. यातील काही शासकीय नोकरीस , काहींनी स्वतः चा व्यवसाय सुरू केला तर काही विद्यार्थी VIDEOCON. ,TATA पुणे संभाजी नगर, मुंबई येथे विविध कंपनीत नोकरी करत आहेत.तसेच छत्रपती संभाजीनगर शहरात नौकरी व व्यवसाय करत आहेत. श्री गुरूजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूरलाप्रात्यक्षिक परिक्षा केंद्रास शासनाची मान्यता मिळाल्या बद्दल. संस्था सचिव अभियता संजय प्र .ॳयाचित , संचालक भूषण दाते,अभियंता सुनिल बोकील,आर्किटेक्ट विजय सहदेव,वैभव कवठाळकर,सुधाकर जोशी यांनी सहसंचालक देवतळे व संचालक व्यवसाय शिक्षण प्ररशिक्षण मुंबई तसेच जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी औताडे यांचे आभार मानले आहेत. अभियता शांताराम देशमुख,ॶभियता संतोष कुलकर्णी,अभियता प्रसाद कुलकर्णी, प्रा. बाळासाहेब चांदकुरकर , तसेच प्राचार्य अविनाश पाटील, बाबा डोंगरे,जि टी जोशी, होळकर ,पी व्ही देशमुख , अभिषेक दुडीले, रणजित कदम, विकास घोडके ,सानिया पठान यांनी संस्थेत विद्यार्थ्याना पेढे वाटप करत आनंद साजरा केला,
