फाटक्या दप्तराने दिली संवेदनेची अनुभूती.
संमेलन आपल्या दारी :लातूरमथ्ये
सुरूवात.
लातूर :
९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वतीने ९५ वे संमेलन ९५ कथाकथन या उपक्रमाचा लातूर येथील शुभारंभ संत ज्ञानेश्वर विद्यालयात करण्यात आला. कथाकार धनंजय गुडसूरकर यांच्या फाटके दप्तर या कथेने संवेदनीची अनुभूती मंगळवारी विद्यार्थ्यांना दिली.
उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात दि. २२ २३ व २४ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ९५ वे संमेलन, ९५ कथाकथन हा उपक्रम जिल्हाभरातील शाळातून घेण्यात येत आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन लातूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मनोहरराव गोमारे याच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून लातूर मसापचे अध्यक्ष डॉ. जयद्रथ जाधव, कथाकार जी. जी. कांबळे, रामदास केदार, रसूल पठाण, नयन राजमाने, शैलजा कारंडे, मुख्याध्यापक एस. एम. वाघमारे, जेष्ठ शिक्षिका मिना नरहारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्तविक शैलजा कारंडे यांनी केले. सूत्रसंचालन नयन राजमाने यांनी तर आभार भाऊसाहेब उमाटे यांनी मानले. यासाठी उपमुख्याध्यापक प्रकाश पेद्दावाड, पर्यवेक्षक संजय मलवाडे, माया अनीगुंटे आदींनी पुढाकार घेतला.
या दोन शाळांतही झाले कथाकथन:
गोदावरी देवी लाहोटी विद्यालयात झालेल्या कथाकथन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका संगीता बोरगावकर होत्या. प्रमुख पाहूणे म्हणून जी. जी. कांबळे, रसूल पठाण आदी उपस्थित होते. नयन राजमाने यांनी वाचाल तर वाचाल ही कथा सादर केली. संमेलनातील बालकुमार मेळाव्याची भुमिका रसूल पठाण यांनी प्रास्ताविकातून सांगीतली. सूत्रसंचालन व आभार संगीता कासार यांनी मानले. तर शहरातील श्रीकिशन सोमानी विद्यालयात झालेल्या कथाकथन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक उमाकांत स्वामी होते. प्रमुख पाहूणे म्हणून पर्यवेक्षक गिरिश कुलकर्णी, शैलजा कारंडे आदी उपस्थित होते. यावेळी धनंजय गुडसूरकर यांनी कथाकथन करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. रामदास केदार यांनी प्रास्ताविक केले. भारती गावंडे यांनी सुत्रसंचालन व आभार मानले.