29.5 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeसाहित्यसाहित्यीक आपल्या घरी... अनोखा उपक्रम !

साहित्यीक आपल्या घरी… अनोखा उपक्रम !


उदगीर – येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी चालू असून, वेगवेगळे ग्रुप, वेगवेगळे पथक, संमेलन यशस्वी होण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून या साहित्य संमेलनामध्ये येणाNया महिला साहित्यिका, (कवयित्री, लेखिका) यांची राहण्याची सोय उदगीर शहरातील जवळपास ३० ते ३५ महिलांनी आपल्याच घरी केलेली आहे.
उदगीर येथे ९५ वें अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक २२, २३ व २४ एप्रिल २०२२ रोजी होणार आहे. या संमेलनामध्ये पूर्ण हिंदुस्तान मधून लेखक, कवी, साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यामध्येच महिला पण बाहेरगावाहून उदगीर शहरात येणार आहेत. व्यवस्थेच्या दृष्टीने उदगीर शहर हे मर्यादित असल्यामुळे महिलांसाठी संमेलनाच्या समितीला खास व्यवस्था करणे अवघड जात होते. त्यामधुनच साहित्यिका आपल्या घरी हा उपक्रम राबविण्याचे ठरवण्यात आले. उदगीर येथील डॉक्टर, प्राध्यापक, राजकीय, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रामध्ये काम करणाNया महिलांनी बाहेरून येणाNया महिला साहित्यिकासाठी आपल्या स्वतःच्या घरी राहण्याची व्यवस्था करण्याचा संकल्प केला.


त्यानुसार ३० ते ३५ कुटुंबातील महिलांच्या घरी त्यांची व्यवस्था केली जाणार आहे. पूर्ण हिंदुस्थानातून जवळपास १५० ते १७५ महिला साहित्यिका उदगीर शहरामध्ये उपस्थित राहणार असल्याची नोंद करण्यात आली आहे. म्हणून या सर्व महिलांना राहणे त्यांच संरक्षण त्यांच्या इतर व्यवस्था करणे यामध्ये अडचण होऊ नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद, नागपूर, बडोदा, झारखंड, बेळगाव, तेलंगणा, बेंगलोर, कर्नाटका अशा अनेक ठिकाणाहून महिला साहित्यिका उपस्थित राहणार आहेत. या सर्वांची व्यवस्था करण्यासाठी खास २०० मुली, महिला स्वयंसेवकांचे काम करणार आहेत. या साहित्यिक महिलांसाठी नाष्टा व जेवणाची व्यवस्था साहित्य संमेलनाच्या वतीने करण्यात आली आहे. या महिला आपल्या घरी या समितीचे प्रमुख प्रा.डॉ. वंदना बांसवाडेकर या आहेत. तसेच यांना सहकार्य करण्यासाठी अंबिका पारसेवार व प्रा.डॉ अनिता सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी महिला झटत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]