वडीलांच्या पुण्य स्मरणार्थ मंदिराला साऊंड सिस्टिम दान
घारोळा येथील चिंते परिवाराचा स्तुत्य उपक्रम
वडवळ नागनाथ: चाकूर तालुक्यातील घारोळा येथील वडील स्व.धोंडीराम चिंते (दादा) यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त चिंते परीवाराच्या वतीने गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरास स्पिकर, सांउड स्टिटीम, चार माईक, दोन कर्णे, एक सांउड, चार स्टॅन्ड दान देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
स्व.धोंडीराम चिंते दादा हे लातूरचे प्रसिध्द डाॅ. डी.एन.चिंते यांचे ते मोठे बंधू होते तर घारोळा येथील भाजपाचे कार्यकर्ते अशोकराव चिंते आणि भागवत चिंते यांचे ते वडील होते.
यावेळी मंदिर कमिटीचे अध्यक्ष रघुनाथराव पाटील, उपाअध्यक्ष डाॅ.डी.एन.चिंते, सचिव प्रभाकर महाराज, सहसचिव नागोराव पाटील, सदस्य वसंतराव उळागड्डे, अशोकराव चिंते, भागवत चिंते, माधव तोरे, माधव कनामे, संग्राम चिंते, सचिन चिंते, रामचंद्र शेळगे, ज्ञानोबा जाधव, वडवळ नागनाथ येथील माजी सरपंच भगवान लोखंडे, बब्रुवान तोरे, आबासाहेब जाधव, श्रीहरी कनामे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दान का द्यावं त्यासाठी एका अभंगात म्हटले आहे… !!1!! देह हे कळाचे धन कुबेराचे ! येथे मणुष्याचे काय आहे!!..याचा अर्थ असा की, आपला देह पण नाही, धन पण नाही. देवाचा स्वभाव तर असा आहे की .!!1!! घेसी तेंव्हा देसी…ऐसा अससी उदार !! काय देवा तुझे…धरोनी कृपनाचे व्दार… देव आदी घेतल्या शिवाय तुम्हाला कांहीच देवु शकत नाही. पुरानातले अनेक उदाहरणे देता येतील. मुष्टीभर पोह्यासाठी गाव सुर्वनाचा दिला गा…तसा देव कांही उपासी नव्हता पण सुदामदेवाकडून मुठभर पोहे घेतले मग सुदाम नगरी सुर्वनाची केली….म्हनूण मणुष्याने कमवलेल्या पैस्यातून कांही ना कांही दान करत जाव…देव तर घेतल्याशिवाय कांही देत नाही आणि धन पण आपल नाही. म्हणून मणुष्याने कमवलेल्या पैस्यातून कांही ना कांही दान ध्याव ती संपत्ती पवित्र होते आणि वाढते हे सुदाम देवाचे उदाहरण आहे. या कार्यक्रमात भजन, किर्तन व अन्नदानही करण्यात आले. वारकरी साहित्य परिषदेचे कार्यअध्यक्ष किर्तनकार ह.भ.प.श्री माधव महाराज शिवणीकर (पंढरपूर) यांचे किर्तन झाले. त्यावेळी गावातील आणि बाहेरगावची अनेक भजनी मंडळी, गायक उपस्थित होते. अशोकराव चिंते यांचे मंदीर कमीटी आणि ग्रामस्थांनी आभार मानले.











