*हरभरा बहरला*

0
679

निटूर व परिसरात हरभरा बहरला ; वातावरण बदलामुळे शेतकरी चिंताग्रस्त..!

खरीप हंगामातील शेतीमधील पिकांचे अतिवृृष्टीमुळे नुकसान झाल्याने आर्थिक संकट ओढवले…

निलंगा,-( प्रशांत साळुंके )-निलंगा तालुक्यातील निटूर आणि परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी यंदा रब्बी पीकात हमखास हरभरा पीक ( जाकी ) जातीचे बियाणे पेरणीसाठी योग्य असल्याने त्यांनी पीक घेतले आहे.रब्बी मशागतपूर्व आपल्या शेतातील शेतकर्‍यांनी मशागत करून प्रथम रानशिवार स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर रब्बीच्या पीकाची रेलचेल सुरू झाली.यात,हारभरा आणि ज्वारी पीक बहरात आले आहे.कांही शेतकरी आपल्या बोअरच्या ठिबक पध्दतीने पाणी हारभरा पीकास देताना पहावयास मिळत आहेत.कारण,हारभरा पीक उगवणी झाल्यानंतर दीड फुटापर्यंत उगवणी झाल्यानंतर आपल्या शेतात गृृहिणीसहीत हारभरा भाजी खुडण्यासाठी लगबग चालू असल्याचे पहावयास मिळत आहे. त्याच अनुषंगाने वातावरण बदलामुळे शेतकर्‍यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सद्यस्थितीला,एक ते दोनदा फवारणी करून हारभरा पीक बहरात येऊन फुलोर्‍याच्या स्थितीत आहे.
यंदा शेतकर्‍यांच्या शेतात रब्बी पीक पेरणीत हारभरा आणि ज्वारी सरासरीनुसार पेरणी अनेक शेतकर्‍यांने केल्याने पीके बहरली आहेत.यापीकासाठी थंडीमुळे वातावरण पोषक आहे.तसेच, पीकासाठी पाण्याची आवश्यकता असल्याने पीके बहरून फुलोर्‍यात दिसत आहेत.रब्बी पीकासोबत घरगुत्ती पालेभाज्या लागणार्‍यामध्ये मिरचा,कांद्याची पात,कोथिंबीर,मव्हुरीची भाजी अनेक पाले भाज्यांचे उत्त्पन्न शेतकरी घेताना दिसत आहेत.

शेतकरी सध्या आपल्या शेतात दिवस-राञ करून पीके कशी बहरात आणावयाची रचना करून आपल्या शेतातील बोअरव्दारे पाणीसाठा करून पाणी आपल्या पीकापर्यंत ठिंबक पध्दतीने पाईपलाईनव्दारे पाणी देण्यात मग्न आहेत.त्यामुळे हारभरा आणि इतर पीके सद्यस्थितीला बहरली आहेत.माञ,वातावरणाच्या बदलानुसार शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे.कारण,दि.30 डिसेंबर रोजी आभाळ काळेकूट दिसत असल्याचे पाहून अनेक शेतकरी आपल्या शेतात जाऊन परिस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज झाला होता.माञ तसे कांही घडले नाही कांही वेळानी आभाळात बदल होऊन ऊन्हाची चाहुल सुरू झाली.वातावरण बदलामुळे अनेक शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहेत.


मागील खरीप हंगामातील पीकांना ” दे धक्का ” देऊन अतिवृष्टीने मोठा आर्थिक फटका देऊन शेतकर्‍यांवर संकट ओठवले होते.त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी यंदा बि-बियाणे ऊसनवारी करून सर्वसामान्य शेतकर्‍यांनी रब्बी पेरा पार पाडून आपली जमिन कसदार करुन उगवणं घेतली आहे.त्यानुसार रब्बी हंगामातील पीके घेण्यासाठी लागवड जास्त प्रमाणात दिसून आल्याने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे.
रब्बी हंगामातील पीकेल तेच उगवेल अशा पध्दतीने यावर्षी शेतकर्‍यांनी कष्ट करून आपले बस्तान बसविले आहे.अनेक शेतकरी,सालगडी,गृृृृहिणी घरगुत्ती शेतीच्या कामासाठी आपल्या वावरात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शेतीतील कामे उरकून घराकडे निघतात यालाच कष्टकरी शेतकरी संबोधले जाते.
एकंदर,सद्यस्थितीला शेतात हारभरा आणि ज्वारीचे पीक घनदाट आल्याने सर्वञ हिरवेगार रानशिवार दिसत आहे आणि शेतात माणुसकीचे दर्शनही पाहावयास मिळत असल्याने कष्टकरी शेतकरी राबताना दिसत आहेत.त्यामुळे राञदिवस करून आपल्या शेतातील पीकांचे उत्त्पन्न वाढीसाठी अनेक शेतकरी पीकांना पाणी देण्यासाठी शेतातचं राहत असल्याचे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here