28.6 C
Pune
Thursday, February 5, 2026
Homeउद्योग‘हर नारंगी पॅक टाटा नमक नही होता’; टाटा सॉल्टची मोहीम

‘हर नारंगी पॅक टाटा नमक नही होता’; टाटा सॉल्टची मोहीम

‘हर नारंगी पॅक टाटा नमक नही होता’ मोहिमेद्वारे महाराष्ट्रामध्ये बनावट उत्पादनांविरोधात लढा देण्यासाठी टाटा सॉल्टची मोहीम

लातूर ( वाणिज्य प्रतिनिधी ): — भारतातील आयोडाइज्ड मीठ विभागात 1983 पासून अग्रणी आणि बाजारातील आघाडीचा ब्रँड असलेल्या टाटा सॉल्टतर्फे ‘हर नारंगी पॅक टाटा नमक नही होता’ हा ठाम संदेश देत, बनावट मीठ पॅकविरोधात लढ्याचे नेतृत्व करण्यात येत आहे. विशेषतः महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असलेल्या असंघटित मीठ बाजारपेठेत आणि बनावट मीठ पॅकच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर शुद्धता व विश्वासाचे नवे मापदंड प्रस्थापित करत, ही जाहीर घोषणा टाटा सॉल्टच्या उत्कृष्ट दर्जाचे मीठ पुरवण्याच्या ठाम वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

‘हर नारंगी पॅक टाटा नमक नही होता’ या घोषणेचा उद्देश प्रत्येक केशरी रंगाचा पॅक टाटा सॉल्टचाच नसतो, याबाबत जनजागृती करण्याचा आहे. या मोहिमेद्वारे दिसायला सारख्या पण बनावट मीठ पॅकबाबत ग्राहकांचे प्रबोधन केले जाणार आहे. भेसळमुक्त, उच्च दर्जाच्या मिठाची हमी देणारा योग्य केशरी रंगाचा पॅक निवडण्याचा हा संदेश आहे. महाराष्ट्रामधील असंघटित मीठ बाजारपेठेतील आव्हानांनंतरही टाटा सॉल्ट ब्रँड हा कुटुंबांच्या आरोग्य व कल्याणासाठी विश्वासार्ह पर्याय आहे. आयोडाइज्ड, भेसळमुक्त मिठाच्या प्रत्येक पॅकद्वारे भारताच्या पोषणविषयक उद्दिष्टांमध्ये योगदान देत, त्याचे पोषणमूल्य अधोरेखित केले जाते.

टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या पॅकेज्ड फूड्स-इंडियाच्या अध्यक्ष दीपिका भान म्हणाल्या, “अलीकडील प्रयोगशाळा चाचणीत भारतभरातील 100 मिठांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यामध्ये टाटा सॉल्टची शुद्धता देशातील इतर 100 मिठांपेक्षा अधिक असल्याचे सिद्ध झाले. महाराष्ट्रामधील ग्राहकांचे टाटा सॉल्ट खूप पसंतीचे आहे. मात्र, दिसायला आणि नावाने साधर्म्य असलेले बनावट ब्रँड त्यांना गोंधळात टाकतात आणि त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण करतात. ‘हर नारंगी पॅक टाटा नमक नही होता’ या मोहिमेद्वारे आम्ही ग्राहकांना आश्वस्त करू इच्छितो की, आमची प्रतिज्ञा शब्दांपुरती मर्यादित नसून, महाराष्ट्रामधील प्रत्येक घराच्या कल्याणासाठीची ती एक ठाम बांधिलकी आहे. या मोहिमेद्वारे ग्राहकांना शिक्षित करण्याचा आणि बनावट उत्पादने व मूळ टाटा सॉल्ट यातील फरक ओळखण्याचे ज्ञान देऊन त्यांना सक्षम करण्याचा आमचा उद्देश आहे.”

टाटा सॉल्ट समुदाय-केंद्रित उपक्रम आणि शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत, पारंपरिक स्वयंपाक पद्धतींमध्ये उच्च दर्जाच्या मिठाचे महत्त्व अधोरेखित करतो व त्यामुळे आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ब्रँड आपल्या मिठाच्या शुद्धतेची हमी देतो, चांगल्या जीवनशैलीला प्रोत्साहन देतो आणि प्रत्येक टप्प्यावर बनावट उत्पादनांविरोधात लढा देण्याच्या आपल्या कटिबद्धतेवर भर देतो.

बनावट मिठाविरोधातील या मोहिमेत टाटा सॉल्ट ग्राहक, समुदाय आणि सर्व संबंधित भागधारकांना’हर नारंगी पॅक टाटा नमक नही होता’ या संदेशाला पाठिंबा देण्यासाठी व अधिक आनंदी महाराष्ट्रासाठी टाटा सॉल्टची निवड करण्याकरता एकत्र येण्याचे आवाहन करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]