27.8 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeठळक बातम्या*हुपरी नगरपरिषदेत तृतीयपंथीस संधी*

*हुपरी नगरपरिषदेत तृतीयपंथीस संधी*

इचलकरंजी ; दि. २२ ( प्रतिनिधी) –-ताराराणी पक्षाच्या वतीने हुपरी नगरपरिषदेच्या सभागृहात स्विकृत नगरसेवक म्हणून तातोबा हांडे यांच्या रूपाने प्रथमच तृतीयपंथीस प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला. त्यामुळे या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

हुपरी नगरपरिषदेच्या स्विकृत नगरसेवकपदी ताराराणी पक्षाचे तातोबा हांडे उर्फ देव तात्या यांची निवड झाली. हुपरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तातोबा हांडे यांनी भरलेला अर्ज त्यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला होता. पण या गोष्टीची दखल घेऊन आमदार प्रकाश आवाडे यांनी हांडे यांना स्विकृत नगरसेवक करण्याचा संकल्प केला. आज शुक्रवारी हा संकल्प पूर्णत्वास आला आहे.
हुपरी नगरपरिषदेत तातोबा हांडे यांची स्विकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी त्यांची भेट घेत हुपरी नगरपरिषदेच्या विकास कामासाठी शुभेच्छा दिल्या. या निवडीबाबत आपण समाधानी असून संपूर्ण राज्यात एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातील तृतीयपंथीयाला संधी देण्याचे काम ताराराणी पक्षाने केले आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी दिली. तसेच याप्रसंगी हुपरी ग्रामदैवत अंबाबाईचे दर्शन घेऊन त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ताराराणी पक्षाचे पक्षप्रतोद सुरज बेडगे, माजी नगरसेवक सुभाष ससे, माजी नगरसेवक मनोहर सुतार, माजी नगरसेवक अमेय जाधव, माजी नगरसेवक प्रताप देसाई, माजी सरपंच बाळासाहेब रणदिवे, योगेश कळंत्रे, अरविंद खेमलापुरे, धनाजी खेमलापुरे, पंकज नाईक, कुणाल म्हेतर, युवराज म्हेतर यांच्यासह पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]