सिध्देश्वर यात्रा महोत्सवानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
लातूर/प्रतिनिधी : ग्रामदैवत श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीचे औचित्य साधून यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ फेब्रुवारी ते २ मार्च यादरम्यान पार पडणाºया या महोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेआहे.महोत्सवासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून या यात्रा महोत्सवात अधिका अधिक भाविक व नागरिकांना सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रशासक सचिन जांबूतकर यांच्या विश्वस्तांनी केले आहे.

राज्यभर परिचित असलेल्या लातूर येथील श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर यात्रा महोत्सव महाशिवरात्रीदिनी म्हणजेच दि. १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या महोत्सवानिमित्त शनिवार मध्यरात्री व रविवार पहाटे गवळी समाजाच्या वतीने श्री सिध्देश्वरास दुग्धाभिषेक होणार आहे. यानंतर श्रीच्या दर्शन सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. रविवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्या हस्ते श्रीची महापुजा होवून झेंडावंदनाने यात्रा महोत्सवास प्रारंभ होणार आहे. तसेच संत सावतामाळी भजनीमंडळ व माळी समाजाच्या वतीने माळी गल्ली येथून मिरवणूक निघून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

याच दिवशी म्हणजे रविवार दि. १५ रोजी दुपारी १ वाजता मार्केट यार्ड परिसरातील गौरीशंकर मंदीर येथून पारंपारिक झेंड्यांच्या काठ्याची मिरवणूक निघणार आहे. सदर मिरवणूकीचा समारोप श्री सिध्देश्वर मंदीर येथेहोणार आहे. रात्री ९ ते ११ या दरम्यान हभप श्री संजय महाराज खडक उमरगेकर यांचे किर्तन तर रात्री ११ ते १ या दरम्यान सुरमणी बाबुराव बोरगावकर, व तालमणी रामभाऊ बोरगावकर यांचे संगीत भजन पार पडणार आहे. सोमवार दि. १६ फेब्रुवारी रोजी विरशैव तेली समाज बांधवांतर्फे श्रीस गंगेच्या पाण्याचा अभिषेक होणार आहे. यादिवशी संध्याकाळी आळंदी येथील हभप श्री माऊली महाराज कदम यांचे किर्तन पार पडणार आहे. मंगळवार दि. १७ फेब्रुवारी रोजी हभप श्री ज्ञानसिंधू संदीपान महाराज हासेगावकर यांचे किर्तन होणार असून बुधवार दि. १८ रोजी हभप श्री गुरुवर्य पुंडलीक महाराज देहूकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. १९ रोजी रात्री ९ वाजता हभप श्री गुरुराज महाराज देगलुरकर यांचे तर शुक्रवार दि. २० रोजी पंढरपुर येथील हभप श्री गोपाळअण्णा महाराज वासकर यांचे किर्तन पार पडणार आहे.

शनिवार दि. २१ रोजी सायंकाळी ६ ते ८ या दरम्यान हभप गुरुबाबा महाराज औसेकर यांचे चक्रीभजन तर रात्री ९ वाजता हभप विजयानंद महाराज सुपेकर यांचे किर्तन पार पडणार आहे. रविवार दि. २२ रोजी सकाळी ११ ते ४ या दरम्यान १००१ महिलांच्या उपस्थितीत श्रीस रुद्राभिषेक करण्यात येणार आहे. तसेच यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजनही केलेले आहे. याच दिवशी रात्री ८ वाजता शिवरुद्र स्वामी यांची संगीत भजनी होणार आहे. सोमवार दि. २३ रोजी सचिन जाधव व वैष्णवी बरकते यांचे तरे मंगळवार दि. २४ रोजी लातूर येथील संतोष थोरात यांचे संगीत भजन पार पडणार आहे. बुधवार दि. २५ रोजी डॉ. दत्ता राजे यांचे संगीत भजन होणार असून गुरुवार दि. २६ रोजी सकाळी ११ वाजता कृषी पदर्शनाचे उद्घाटन पार पडणार आहे.
याच दिवशी देवस्थान परिसरात पशु व पक्षी पदर्शनाचे उद्घाटन होणार असून यावेळी उत्कृष्ट पुश व पक्षींची निवड स्पर्धा पार पडणार आहे. या दिवशी रात्री ८ वाजता विठ्ठलराव जगताप यांचे संगीत भजन होणार आहे. शुक्रवार दि. २७ रोजी सकाळभ ११ वाजता पशु अश्व व श्र्वान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी उत्कृष्ट पशु, अश्व व श्र्वान यांची निवड होणार आहे. या स्पर्धेत निवड झालेल्या पशुंना लातूर बाजार समितीच्या वतीने चांदीचा रथ देण्यात येणार असून पशु मालकास प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे. शनिवार दि. २८ रोजी लातूर येथील सुरमणी भुजंग मुर्के तर रविवार दि. १ मार्च रोजी श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम संपन्न होणार आहे. रविवार दि. १ मार्च रोजीच देवस्थान परिसरात सकाळी ११.३० पासून कुस्ती स्पर्धांचा फड रंगणार आहे. सोमवार दि. २ मार्च रोजी रात्री ८ वाजता उपविभागीय अधिकारी रोहिणी नºहे यांच्या उपस्थितीत शोभेच्या दारुची आतिषबाजी करून यात्रा महोत्सवाचा समारोप होणार आहे. तसेच याच दिवशी रात्री ९ ते ११ पंडरपुर येथील हभप माधव महाराज शिवणीकर यांचे काल्याचे किर्तन पार पडणार असून यानंतर श्रीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच दहीहंडी व महाप्रसादाचे आयोजन यावेळी करण्यात आलेले आहे.यात्रा महोत्सव १५ दिवस पार पडणार असून यासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. यावर्षी यात्रा महोत्सवात भाविकांसह नागरिकांसाठी विविध आकर्षण राहणार असून आनंद मेळा यासह देवस्थान परिसरात विविध खाद्यपदार्थ व साहित्यांचे स्टॉलही असणार आहे.
या यात्रा महोत्सवात लातूर व परजिल्ह्यासह परराज्यातील नागरिक व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासक सचिन जांबूतकर यांच्यासह विश्वस्त विक्रम गोजमगुंडे, श्रीनिवास लाहोटी, प्रदीप राठी, मन्मथ लोखंडे, बाबासाहेब कोरे, अशोक भोसले, नरेश पंड्या, सुरेश गोजमगुंडे, रमेशसिंह बिसेन, चंद्रकांत परदेशी व व्यंकटेश हालिंगे यांनी केले आहे.चौकटरक्तदात्यास थेट दर्शनयात्रा महोत्सवानिमित्त लातूर येथील डॉ. भालचंद्र ब्लड बँकेच्या वतीने देवस्थन परिसरात महाशिवरात्री दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाशिवरात्री दिवशी श्री सिध्देश्वराच्या दर्शनासाठी भाविक व नागरिकांची मोठी गर्दी असते त्यामुळे रक्तदान शिबिरात रक्तदान केलेल्या दात्यास थेट दर्शनाचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे या शिबिरात अधिकाधिक भाविकांनी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




