25.1 C
Pune
Wednesday, October 29, 2025
Homeसामाजिक*अँड. गंगणे भूषण पुरस्काराने सन्मानित*

*अँड. गंगणे भूषण पुरस्काराने सन्मानित*

अँड प्रदिपसिंह गंगणे यांचा पद्मश्री पोपटराव पवार
यांच्या हस्ते भूषण पुरस्काराने सन्मानित

लातूर – दि.;२८ नोव्हेबर २०२२ सामाजिक, शैक्षणिक, महीला व बालकल्याण , सामाजिक, राष्ट्रीय सदभावना क्षेत्रात अविरत कार्याबद्दल अँड प्रदिपसिंह तुळशीदास गंगणे यांचा ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन आयोजित सन्मान जिल्हयाचा, सन्मान कर्तृत्वाचा भूषण पुरस्कार २०२२ पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे.


साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती कृषिरत्न संजिव माने, योगाचार्य डॉ प्रज्ञा पाटील, सुनिल बेळगावें, सौ स्मिता बेळगावें आदीची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने केले तर कार्यक्रमांचा शेवट २६.११च्या हल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमांचे निवेदन यांनी केले तर आभार यांनी केले आहे
अँड प्रदिपसिंह तुळशीदास गंगणे हे विद्यार्थी अवस्थेपासुन सामाजिक ,महीला, बालविकास कल्याण, सामाजिक, राष्ट्रीय सदभावना क्षेत्रात कार्यरत आहेत. लातूर जिल्हयातील सामाजिक चळवळीतील युवकातील नाव म्हणजे अँड प्रदिपसिंह गंगणे यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते वीर भगतसिंह विद्यार्थी गौरव पुरस्कार, अखिल भारतीय छावा संघटनेचा सामाजिक पुरस्कार, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार,डॉ सौ चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील पुरस्कार, मुंबई संध्या परिवाराचा सेवादिप पुरस्कार, मुंबई जनगौरव कार्यदर्पण आयकॉन पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अँड प्रदिपसिंह गंगणे यांचे अभिनंदन माजी राज्यमंत्री आ संजय बनसोडे, माजी आ वैजनाथ शिंदे, ज्येष्ठ विधीज्ञ व्यकटराव बेंद्रे, प्रा डॉ बी व्हीं मोतीपवळे, मकरंद सावे, इंजिनियर सागर भागवत,सिनेट सदस्य धनराज जोशी, ताहेरभाई सौदागर, अँड सुहास बेंद्रे, प्रा एकनाथ पाटील,जमाल्लोद्दीन मणियार, बालाजीअप्पा पिंपळे,अँड अमितकुमार कोथमिरे, डॉ विशाल मैदरकर, सुनिल कांबळे,डॉ अंबादास कारेपुरकर, संतोष मस्के, रामभाऊ जवळगेकर, अँड अभिजित मगर, सुशिलसिंह चौहाण, आनंद पारसेवार,सुनिल दुरुगकर आदींनी कौतुक केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]