रक्तदान शिबीर ; विविध क्षेञातील मान्यवरांचा ” कोरोना योध्दा ” म्हणून सन्मान….
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-निलंगा तालुक्यातील अंबुलगा ( मेन ) याठिकाणी श्री व्यंकटेश चॅरिटेबल ट्रस्ट,निलंगाच्या वतीने अँड.तिरूपती शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उदघाटक तहसिलदार गणेश जाधव यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.विविध क्षेञातील मान्यवरांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले तसेच भव्य-दिव्य सर्वरोग निदान,रक्तदान शिबीराचे आयोजनही याप्रसंगी करण्यात आले.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर,पोलीस उपनिरीक्षक प्रणिता गायकवाड,निलंगा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बाळासाहेब ऊर्फ श्रीकांत शिंगाडे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंडीतराव धुमाळ,संगायोचे सदस्य सुरेंद्र धुमाळ,माजी पंचायत समिती सभापती अजित माने,डाॅ.लालासाहेब देशमुख,वकील मंडळाचे अध्यक्ष ओम माने,पंचायत समितीचे सदस्य महेश देशमुख आदी जणांची उपस्थिती होती.

अँड.तिरूपती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेञातील सामाजिक मान्यवर,पञकार मान्यवर,आरोग्य विभागातील डाॅक्टर व आशा कर्मचारी,पोलीस विभागातील कर्मचारी,सेवाभावी सस्था यांचा कोरोना योध्दा म्हणून प्रमाण-पञ,शाल,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.यात पञकार गोविंद इंगळे,लक्ष्मण पाटील,आनंद माने,परमेश्वर शिंदे,माधव पिटले,तुकाराम सुर्यवंशी,के.वाय.पटवेकर,शिवाजी काळे,राजकुमार सोनी,रविकिरण सूर्यवंशी,जावेद मुजावर,माधव शिंदे,प्रशांत साळुंके,असलम झारेकर,नामदेव तेलंगे,रमेश शिंदे यांचा विशेष कामगिरीबद्दल कोरोना योध्दा म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.












