अँड रंगनाथराव कातळे यांचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा
रेणापूर – रेणापूर येथील सेवा सहकारी संस्थेचे माजी चेअरमन ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच यासह दूध संस्था, पतसंस्था आदि विविध संस्थेत निस्वार्थपणे काम करून गोरगरीब सर्वसामान्यांच्या मनावर वेगळी छाप निर्माण करणारे अँड. रंगनाथरावजी कातळे यांनी नुकतीच वयाची 75 वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने त्यांचा अमृत महोत्सव सोहळा 28 नोव्हेंबर रविवारी अनेकांच्या उपस्थित मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

अॅड. रंगनाथराव कातळे यांचा अमृत महोत्सव आणि यांचे लहान बंधू रावसाहेब कातळे यांनी वयाची 71 वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने त्यांचा सन्मान सोहळा अँड. कातळे यांच्या मुलींनी रेणुका देवी मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने समाजातील सर्व स्तरातील अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अर्चना कातळे-टेंगसे यांनी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. त्यानंतर उपस्थित अनेक मान्यवरांनी रंगनाथरावजी कातळे यांचे निष्कलंक आयुष्य, निस्वार्थ भावना, गोरगरिबांना अडीअडचणीत त्यांच्या कामात मदत करण्याची जिद्द, चिकाटी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत याबाबत आलेले अनुभव सांगून आयुष्य किती दिवस जगलो यापेक्षा कसे जगलो याला अधिक महत्त्व असल्याचे बोलून दाखविले व दोन्ही कातळे बंधूंना शुभेच्छा दिल्या. तर प्राजक्ता कापसे आणि जिया आपेट या लहान नातीनी आपल्या भावना व्यक्त केल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले.

याप्रसंगी रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ, गंगाखेड येथील संत जनाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. आत्मारामजी टेंगसे, अंबाजोगाई येथील मुख्य सरकारी विधिज्ञ अँड. शिवाजीराव कराड, स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठाचे डॉ अजय टेंगसे, माजी सरपंच म श हालकुडे, मनोज शेंडगे डॉ. रवी मनदुमले, माजी चेअरमन लक्ष्मण ईगे, बाबुराव जाधव, दिलीप पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद जाधव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष बालाजी कदम,अंबाजोगाई कारखान्याचे संचालक जनार्दन माने, रेणा कारखान्याचे संचालक पंडित माने, नामदेव साबळे, प्रा. उजळबे सर, प्रा लोभाजी उद्धव कराड, धनंजय कापसे, मनोहर माने, प्रदीप मिरजकर रेनापुर तालुका संगायोचे अध्यक्ष गोविंद पाटील सतीश पवार अँड कातळे यांचे पाचही जावई डॉ किशोर शेंडगे, प्रा. अरविंद गाडे, राजेश कापसे संतोष आपेट अँड. कुलदीप टेंगसे यांच्यासह रेणापुर आणि परिसरातील राजकीय सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवर महिला पुरुष मोठ्या संख्येनी उपस्थित होते.












