पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अक्का फाउंडेशन व लातूर भाजपा तर्फे वाढदिवसानिमित्त १ लाख स्क्वेअर फूट जागेत हरित प्रतिमा उभारून शुभेच्छा देण्यात आल्या…!
माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील पहिला हरित प्रतिमेच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

लातूर,-( प्रतिनिधी )-लातूर जिल्ह्यातील कलाकार मंगेश निपाणीकर यांनी ग्रास कटिंगच्या माध्यमातून अखंड भारताचा नकाशा व पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिकृती तयार करून अक्का फाउंडेशन व लातूर जिल्हा भाजपा तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्याचे माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अखंड भारताचे स्वप्न या प्रतिकृती द्वारे साकारण्यात आले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र मिळून कार्य करण्यात आल्याचे आ.निलंगेकर यांनी सांगितले.
याप्रसंगी खा.सुधाकर शृंगारे, आमदार रमेश कराड, शहराध्यक्ष गुरुनाथ मगे, मनपा गटनेते नेते शैलेश गोजमगुंडे, प्रदेश भाजप युवा मोर्चा सचिव प्रेरणाताई होनराव, गणेश गोमसाळे, सरचिटणीस दिग्विजय काथवटे, शिरीष कुलकर्णी, प्रवीण सावंत व भाजपा नगरसेवक, पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.












