देसाईगंज (वार्ताहर) :-
स्थानिक भगतसिंग वार्डात जख्मी अवस्थेत असलेल्या माकडाला पडून वडसा वन विभाग व देसाईगंज संघर्ष समितीच्या सदस्यांनी जीवनदान दिले.
सविस्तर व्रुत असे की, दि. 6 मे 2022 ला भगतसिंग वार्ड, देसाईगंज येथे एक माकडाचा लहान पिल्लु विद्युत शॉक लागून जख्मी झाला होता. तेव्हा काही नागरिकांनी त्याला पाणी दिले. तद्नंतर तो माकड तेथून समोर गेला. मात्र जखम गंभीर असल्याने त्याला पुढे जाण्यास अडचण निर्माण होत होती. मात्र याची कल्पना कुणालाच आली नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे आज दि. 7 मेला दुपारी तो माकड भगतसिंह वार्डात संपादक प्रभातकुमार दुबे यांच्या घरा शेजारी एक कुलर च्या खाली बसल्या अवस्थेत दुपारच्या सुमारास खेळणाऱ्या मुलांना दिसला. सदर बाब वाऱ्यासारखी पसरली. लगेच संपादक दुबे यांचे पुत्र प्रकाश दुबे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून झालेल्या दुखापतीची सूचना वडसा वन विभाग वडसा चे क्षेत्र सहाय्यक श्री कऱ्हाडे यांना दिली. माकड असल्याने त्याला पिंजऱ्यात पकडावे लागणार व पिंजरा सुध्दा शॉप शूटर आले असल्याने जंगलात नेल्याची माहिती कऱ्हाडे यांनी दिली.

दरम्यान तो पर्यंन्त याची माहिती प्रकाश दुबे यांनी PEAW गडचिरोली जिल्हा या व्हाट्सअप ग्रुपवर शेअर केली. लगेच ग्रुपवर याची चौकशी सुरू झाली. तेव्हा उशीर होत असल्याचे पाहून क्षेत्र सहाय्यक श्री कऱ्हाडे हे स्वतः घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी आपल्या सहकार्यां सोबत सदर माकडाला चादर मध्ये पकडले. माकड जख्मी असल्याने व किमान 5/ते 6 महिन्यांचा असल्याने त्याने पकडणाऱ्याना काहीच केले नाही. याच दरम्यान पशुमित्र प्रकाश जिवानी हे आपले सहकारी देसाईगंज संघर्ष समितीचे पदाधिकारी श्री भरत दयलानी, दिपक नागदेवे, रितेश नागदेवे सह येऊन त्यांनी लगेच घटना स्थळावरच देसाईगंज येथिल पशुवैद्यकीय अधिकारी जी.एन. कोराने, डॉ. नंदेश्वर यांना पाचारन करून तेथेच प्रथोमोपचार करून माकडाला वन विभागाच्या स्वाधीन करून त्याला पुढील उपचारा करिता चंद्रपुर येथे पाठविण्याचे कळविले.
अश्याने जख्मी माकडाला वन विभाग वडसा व देसाईगंज संघर्ष समितिने पशुमित्र प्रकाश जीवानी व वेळेवर वन विभागाला माहीती देणारे प्रकाश दुबे यांनी जीवनदान दिले.




