23.1 C
Pune
Thursday, June 19, 2025
Homeदेश विदेश*अग्नीपथावर केंद्र सरकार*

*अग्नीपथावर केंद्र सरकार*

राजकारण

★★’जाळपोळ’आंदोलनाचे समर्थन अशक्यच !★★

राजेंद्र शहापूरकर 

केंद्र सरकारने कोणतीही योजना जाहीर केली की त्या योजनेला विरोध केलाच पाहिजे , विरोध प्रगट करण्यासाठी दगडफेक, जाळपोळ केलीच पाहिजे असे काही मंडळींनी ठरवूनच टाकलेले आहे असे दिसते.
नागरिकत्व कायद्यातील तरतूद असो, कृषी सुधार योजना असो की आताची ही ‘अग्निपथ – अग्निविर’ योजना असो. अगदी एकसारखी पद्धत दिसून येते. त्याशिवाय कोणत्या ना कोणत्या कारणांच्या निमित्ताने जुम्मा नमाजा नंतर होणारा उद्रेक तर ठळकपणे डोळ्यात भरणारा आहे.


बिहार मधील हिंसाचार मोदींच्या राजकीय विरोधकांनी सुनियोजित पद्धतीने अपप्रचार करून घडवून आणल्याचे जाणवते. यथावकाश या गोष्टी प्रकाशात येतीलच. पण
अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या मंडळींच्या समाज माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या ‘बायकॉट अग्निविर योजना’ , अग्निविर योजना बंद हो’ या पेजवर नजर टाकली तरी बरेच काही स्पष्ट होते. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, आणि डाव्या बरोबरच राकेश टिकैतप्रेमींची या अशा पेजवर भरमार डोळ्यात भरते यातच सर्व आले. त्यामुळेच तथाकथित पुरोगामी लिब्रांडू कडून हिंसाचारचा एक शब्दही ऐकू येत नाही.हिंसाचाराचे समर्थन होऊच शकत नाही.

अग्निपथ योजनेत काही त्रुटी असू शकतात , त्यात सुधारणा करण्याची गरज असू शकते पण म्हणून देश जाळायचा ? सेवेत जाण्याआधीच अव्यवहार्य अटी घालणे, सैन्याचा पायाच ठिसूळ होईल असा अपप्रचार करणे हा खोडसाळपणाच आहे. ज्या पंतप्रधानांनी सर्वोच्च प्राधान्य देशाच्या संरक्षणाला दिले आणि सामर्थ्यवान सैन्यकवच उभे केले ते आपल्याच सेनेच्या पायावर आघात करणारी योजना आणतील किंवाआखतील हे पटणारे नाही. तसेच ज्या युवाशक्तीला विविध क्षेत्रात संधी आणि रोजगार उपलब्ध करण्यासाठी ते झटतआहेत..अशा त्यांच्या सर्व प्रयत्नांना हिंसक खीळ घालण्याचे हे प्रयत्न कठोरपणे मोडून काढले पाहिजे , असे प्रामाणिकपणे वाटते.

विश्लेषण

………….

राजेंद्र शहापूरकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]