अतिवृष्टीग्रस्तांसाठी अभिमन्यू पवारांचा हातभार
– सव्वा कोटींची मदत १२०० कुटुंबांना
“”आपत्तीच्या काळात आधार
–आ अभिमन्यू पवारांच्या पुढाकाराने १२०० कुटुंबांना सव्वा कोटींचा दिलासा”
हभप गहिनीनाथ महाराज,बी बी ठोंबरे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप
औसा – अतिवृष्टीग्रस्त १२०० कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकाराने क्रीएटीव्ह फाउंडेशन व अभय भुतडा फाउंडेशनच्या माध्यमातून अंदाजे सव्वा कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली.

औसा येथील विजय मंगल कार्यालयात (१५) ऑक्टोबर रोजी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, तसेच विविध मान्यवर आणि हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.गहिनीनाथ महाराज म्हणाले, राज्यकर्त्याने तत्त्वज्ञानी असणे आवश्यक आहे आणि आमदार अभिमन्यू पवार यांचा तत्त्वज्ञानावर चांगला अभ्यास आहे. ते लोकांशी आपलेपणाने वागत असल्यामुळे जनतेचा ओघ त्यांच्या मागे आहे. अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या कुटुंबांना केवळ आर्थिक मदतच नाही, तर मानसिक आधार देण्याची तळमळ त्यांच्यात आहे.ज्या माणसाला लोकांनी सहकार्य केल्याची जाणीव असते, तो कधीही अपयशी ठरत नाही. ती जाणीव आमदार पवार यांच्यात स्पष्ट दिसते,” असेही त्यांनी नमूद केले.

या उपक्रमामुळे मतदारसंघात विकासकामांना गती मिळाली असून, लोकहिताची कामे प्रामाणिकपणे करणारा आमदार मिळणे हे मतदारांचे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाने केवळ मदतीचे वितरण झाले नाही, तर एक आशावाद आणि सामाजिक बांधिलकीची जाणीवही निर्माण केली. आमदार अभिमन्यू पवार यांच्या या सामाजिक भान आणि तळमळीच्या पुढाकाराचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले.

यावेळी मंचावर उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम अडसूळ, कासारशिरसी अपर तहसीलदार शिवाजी कदम, किल्लारी अपर तहसीलदार सागर मुळीक, संतोष मुक्ता, सुभाष जाधव, क्रेटिव्ह फाउंडेशन चे सचिव सुहास पाचपुते,सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती प्रा भीमाशंकर राचट्टे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दुःखितांचे अश्रू पुसणारा आमदार अभिमन्यू पवार बी बी ठोंबरे दुःखितांचे अश्रू पुसण्याचे खरे कार्य आमदार अभिमन्यू पवार यांनी केले आहे.

शेतकऱ्यांचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी त्यांनी केवळ आर्थिक मदतच केली नाही, तर त्यांच्या उपजीविकेच्या साधनांचा विचार करून निर्णय घेतले आहेत,” असे गौरवोद्गार नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी काढले.औसा येथील विजय मंगल कार्यालयात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त कुटुंबासाठी त्यांनी या प्रसंगी ११.५१ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली.

बी बी ठोंबरे पुढे म्हणाले, “समाजात तत्त्व असतात, पण ती तत्त्व आचरणात आणणं गरजेचं असतं. आमदार पवार यांनी अभय भुतडा यांच्या माध्यमातून ती तत्त्वं लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. इतर आमदारांनीही त्यांच्या कार्यशैलीचा आदर्श घ्यावा.आमदार अभिमन्यू पवार यांनी कोणताही राजकीय रंग न लावता ही मदत केली आहे. निवडणूक संपल्यानंतर गट तट विसरून सर्वांचा आमदार म्हणून त्यांनी काम केले आहे. मदतीचा पैसा त्याच कामासाठी वापरण्यात यावा, ही त्यांची अपेक्षा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.किल्लारी कारखान्याच्या पुनरुज्जीवनाचे श्रेयही ठोंबरे यांनी आमदार पवारांना दिले. “येणाऱ्या दोन वर्षांत किल्लारी कारखाना कर्जमुक्त होऊन राज्यात आदर्श ठरेल. शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस किल्लारीला द्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
. .यापुढेही नैसर्गिक आपत्तीत सरकारसारखीच माझी मदत असेल – आमदार अभिमन्यू पवारआई-वडिलांनी माझे नाव अभिमन्यू ठेवले, पण राजकीय जन्म तुम्ही दिला त्यामुळे तुमचा संसार उघड्यावर पडू देणार नाही, अशा भावनिक शब्दांत आमदार अभिमन्यू पवार यांनी अतिवृष्टीग्रस्त जनतेप्रती आपली जबाबदारी व्यक्त केली.यंदा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ५० वर्षांतील विक्रमी पावसाने मोठ्या प्रमाणात हानी केली. जीवित हानी टळली असली, तरी पशुहानी व शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. यानंतर पवारांनी ४८ गावांचा दौरा करत वास्तव पाहिले. काही ठिकाणी नदीचे प्रवाह बदलले आणि संपूर्ण गावे पाण्याखाली गेली होती.सरकारी मदतीबरोबरच अतिरिक्त मदतीची गरज असल्याने उद्योजक अभय भुतडा यांच्याशी संपर्क साधून एक कोटी रुपयांची मदत उभी केली. यामध्ये आणखी गावांचा समावेश करून मदतीची रक्कम आता दीड कोटी रुपयांच्या घरात पोहोचत आहे.“ही मदत फक्त आकड्यापुरती न राहता, जनतेच्या घरट्याचा आधार बनावी,” असे सांगत पवार म्हणाले, “जोपर्यंत अंधार आहे, तोपर्यंत तुमच्यासोबत राहीन. ही जनता माझी आहे.”त्यांच्या या तळमळीच्या वक्तव्याने उपस्थितांमध्ये विश्वास आणि आश्वासक ऊर्जा निर्माण झाली
…………..




