39 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*अदानी (इंधन) समायोजन आकाराचा जबरदस्त दणका*

*अदानी (इंधन) समायोजन आकाराचा जबरदस्त दणका*

महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना

सर्व वीजग्राहकांवर २० टक्के वाढ – प्रताप होगाडे

इचलकरंजी दि. २५ – “राज्यातील घरगुती, व्यापारी, शेतकरी, औद्योगिक व अन्य सर्व २.८७ कोटी ग्राहकांवर जुलै २०२२ मध्ये मिळालेल्या बिलापासून ५ महिन्यासाठी अदानी (इंधन) समायोजन आकार या नावाखाली थेट वीज आकाराच्या २०% दरवाढ लागू करण्यात आली आहे. याशिवाय थकीत इंधन समायोजन आकार १२२६ कोटी रू., अदानीचे राहीलेले देणे ७७०९ कोटी रू. व समान करार असलेल्या रतन इंडियाचे देणे हा बोजा डिसेबर २०२२ पासून लागू होण्याची शक्‍यता आहे.” अशी माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना अध्यक्ष व वीज तज्ञ प्रताप होगाडे यांनी जाहीर प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे…

त्याशिवाय महावितरण कंपनी सप्टेंबर २०२२ नंतर मध्यावधी फेरआढावा याचिका दाखल करणार हे निश्‍चित आहे. या याचिकेद्वारे २ वर्षांचा कोरोना काळातील घाटा व खर्चातील वाढ या नावाखाली पुन्हा २०,००० कोटी रू. व अधिक वाढ मागणीची शक्‍यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी आजच जागरूकतेने या दरवाढीस विरोध करणे व शासनाने हस्तक्षेप करावा यासाठी चळवळ व आंदोलन करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यस्तरीय समन्वय समितीने दि. ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या आठवड्यात राज्यात सर्वत्र जिल्हा, विभाग वा तालुका स्तरावर आंदोलन जाहीर केलेले आहे.

कोणत्याही वर्गातील ग्राहकांना न परवडणारी व न झेपणारी ही दरवाढ सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे आहे…

वीज दर वाढ – अदानी (इंधन) समायोजन आकार जुलै २०२२ बिलापासून पुढील ५ महिन्यांसाठी नोव्हेंबर २०२२ पर्यंत लागू 

वीज ग्राहक वर्गवारी तपशील वहन आकार + वीज आकार रु. प्रति युनिट वाढ रु. प्रति युनिट – अदानी (इंधन) समायोजन आकार 
लघुदाब – घरगुती १ ते १०० युनिटस पर्यंत१.३५ +  ३.३६ ०.६५ 
१०१ ते ३०० युनिटस पर्यंत१.३५ +  ७.३४ १.४५ 
३०१ ते ५०० युनिटस पर्यंत१.३५ +१०.३७ २.०५ 
५०० च्या वरील युनिटस१.३५ +११.८६ २.३५ 
लघुदाब – व्यापारी ० ते २० किलोवॉट पर्यंत १.३५ + ७.०७ १.४० 
>२० ते ५० किलोवॉट पर्यंत १.३५ +१०.७९२.१५
५० किलोवॉटचे वर१.३५ +१२.७६ २.५५
लघुदाब – शेती शेतीपंप – मीटर्ड १.३५ +  १.९५०.४० 
शेती अन्य वापर मीटर्ड१.३५ +  ३.२९ ०.६५
लघुदाब – औद्योगिक ० ते २० किलोवॉट पर्यंत १.३५ +  ५.१११.००
२० किलोवॉटचे वर१.३५ +  ६.०५ १.२०
ऊच्चदाब – औद्योगिक ११/२२/३३ केव्ही ०.५५ +  ६.८९ १.३५ 
ऊच्चदाब – शेती पंप 

ऊच्चदाब – शेती अन्य 
उपसा सिंचन योजना

पोल्ट्री, कोल्ड स्टोरेज, अन्य
०.५५ +  ३.६९ 

०.५५ +  ५.१०
०.६५ 

१.००


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]