औसा तालुक्यातील सारोळा व एरंडी येथे
ट्वेन्टीवन ॲग्री लि., संचालीका सौ. अदिती अमित देशमुख
यांनी अश्वगंधा वनस्पती काढणीची केली पाहणी
*लातूर (प्रतिनिधी): (गुरूवार दि. २८ एप्रिल २०२२)*
ट्वेन्टीवन ॲग्री लि., ने आंतरराष्ट्रीय आयुर्वेदीक कंपनीच्या सोबत पुढाकार घेऊन औसा तालुक्यातील सारोळा व एरंडी या गावात अश्वगंधा वनस्पतीची लागवड केली होती. या वनस्पतीची काढणी सदया सुरू आहे या काढणी करण्यात येत असलेल्या वनस्पतीची पाहणी ट्वेन्टीवन ॲग्री लि., च्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांनी केली आहे.
यावेळी ट्वेन्टीवन शुगर लि., चे व्हा. चेअरमन विजय देशमुख, संगिता मोळवणे, धनंजय राऊत, अविनाश देशमुख, पंडितराव ढमाले आदी उपस्थित होते.

सुगंधी औषधी वनस्पती लागवड योजना ट्वेन्टीवन ॲग्री लि., ने आंतरराष्ट्रीय आयुर्वेदीक कंपनीच्या सोबत पुढाकार घेऊन राबविली आहे. या अश्वगंधा काढणीचा हंगाम सुरू असून औसा तालुक्यातील सारोळा येथील कमलाकर शेळके व औसा तालुक्यातील एरंडी येथील बालाजी विठ्ठल चलवाड यांच्या शेतातील अश्वगंधा वनस्पतीची पाहणी ट्वेन्टीवन ॲग्री लि.,च्या संचालीका सौ. अदिती अमित देशमुख यांनी प्रत्यद्श क्षेत्रावर जाऊन केली. अश्वगंधा वनस्पती लागवड ते काढणी बाबतचे शेतकऱ्यांचे अनुभव चर्चा करून जाणून घेतले.

यावेळी सारोळा येथे कमलाकर शेळके, बळवंतराव पाटील, ज्ञानेश्वर भोसले, विजय कांबळे तर एरंडी येथे नामदेव कोणाळे, प्रकाश पाटील, विजय कांबळे आदी उपस्थित होते.
————




