लातूर -ज्येष्ठ साहित्यिक व शेती प्रश्नांचे मूलगामी अभ्यासक डॉ. शेषराव मोहिते यांच्या “अधले मधले दिवस” या ललित लेख संग्रहाचे प्रकाशन मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूरच्या वतीने शनिवार दि.०९ जुलै २०२२ राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या व्ही.एल.सी सभागृहात सायंकाळी ४.०० वा आयोजित करण्यात आले आहे. या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे तर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कथा -कादंबरीकार श्री. आसाराम लोमटे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. या महत्त्वपूर्ण प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य अनिरुद्ध जाधव व कैलास पब्लिकेशन्स औरंगाबादचे के. एस. अतकरे उपस्थित राहणार आहेत.

डॉ. शेषराव मोहिते यांनी ‘बरा हाय घरचा गोठा’ हा कथासंग्रह,
‘असं जगणं तोलाचं’ व
‘धूळपेरणी’ या कादंबऱ्या,
‘शेती व्यवसायावरील अरिष्ट’ हे शेती प्रश्नांची मांडणी करणारा वैचारिक ग्रंथ,
‘बोलिलो जे कांही’ ललित लेखसंग्रह आणि
‘ग्रामीण साहित्य : बदलते संदर्भ’ हा समीक्षाग्रंथ आदी साहित्य डॉ. शेषराव मोहिते यांचे प्रकाशित आहे.
डॉ. शेषराव मोहिते हे आपल्या लेखनातून कृषिवलयाच्या कृषी संस्कृतीचा व शेतकऱ्यांच्या शोषणव्यवस्थांचा मुळापासून शोध घेणारे महत्त्वपूर्ण लेखक आहेत. ते शेतकरी साहित्याचे, संघटनेचे चिंतक आहेत. या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन मसापचे अध्यक्ष डॉ. जयद्रथ जाधव,सचिव डॉ. दुष्यंत कटारे, सुनीता अरळीकर, विवेक सौताडेकर, प्रकाश घादगिने, नरसिंग इंगळे, शैलजा कारंडे, प्रा. नयन राजमाने, डॉ. ज्ञानदेव राऊत, डॉ. संभाजी पाटील यांनी केले आहे.