अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख यांची निवड

0
376

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांची 

भारतीय आर्युविज्ञान अनुसंधान परिषद प्रशासकीय परिषदेवर निवड

लातूर,-(प्रतिनिधी)- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथील अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांची भारतीय आर्युविज्ञान अनुसंधान परिषद (ICMR), नवी दिल्ली येथील परिषदेच्या (Governing Council ) प्रशासकीय परिषद या पदावर निवड झाली आहे.

या निवडीबाबत भारतीय विश्वविद्यालय संघाचे महासचिव डॉ. पंकज मित्तल यांनी पत्राद्वारे प्राध्यापक डॉ. करमालाकर, कुलगरु, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांना कळविले आहे. डॉ. सुधीर देशमुख यांची निवड मतदानाद्वारे झाली आहे.

या निवड प्रक्रियेसाठी भारतातील सर्व राज्याच्या विद्यापीठातील कुलगुरुंनी मतदान केले आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद ही भारतामध्ये वैद्यकशास्त्रातील संशोधन आणि सहयोगाला उत्तेजन देणारी शिखर संस्था आहे.

डॉ. सुधीर देशमुख यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकशास्त्राच्या संशोधनास चालना मिळणार आहे.

डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता यांच्या निवडीबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, मुंबईचे संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, सह संचालक, डॉ.चंदनवाले,

प्राध्यापक डॉ. करमालाकर, कुलगरु, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक, डॉ. के. डी. चव्हाण, कुसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक तसेच राज्यातील सर्व वैद्यकीय, दंत, आर्युवेद, भौतिक उपचार महाविद्यालयातील अध्यापकांनी व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सर्व विभागप्रमुख, सर्व अध्यापक,सर्व कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here