*अध्यात्म हाच मानवाच्या जीवनाचा आधार आहे – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर*

0
389


लातूर दि.15/07/2022
मानवाला आपले जीवन आनंदी, समाधानी यशस्वी व आत्मविश्‍वासी करण्यासाठी अध्यात्माचा विचार हाच त्याचा मूळ आधार आहे. त्यातूनच मानवाला आत्मविश्‍वास, शक्‍ती, उर्जा मिळते. बाह्य वस्तूतून नाही, त्यामुळे आध्यात्म हाच मानवाच्या जीवनाचा मुख्य आधार आहे, असे प्रतिपादन भाजपा नेते तथा  भाजपा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते ह.भ.प.रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांच्या रामकृष्ण मंगल कार्यालय कन्हेरी रोड मोती नगर लातूर येथील हरी कीर्तन कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमाला भाजपा  युवा नेते तथा युवा मोर्चाचे शहर जिल्हा अध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, जे.एस.पी.एम.संस्थेच्या संचालिका आदितीताई अजितसिंह पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार, समन्वयक बापूसाहेब गोरे,  शैक्षणिक समन्व्यक संभाजीराव पाटील रावणगावकर, एम.एन.एस.बँकेचे कार्यकारी संचालक बाळासाहेब मोहिते,बाबासाहेब कोरे,एमएनएस बँकेचे संचालक भाई एस.आर.मोरे, संचालक सुभाषअप्पा सुलगुडले, विश्‍वजीत पाटील कव्हेकर, मा.नगरसेविका रागिणीताई यादव, प्राचार्य आर.एस.अवस्थी, मुख्याध्यापक मोहन खुरदळे मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होेते.
यावेळी पुढे बोलाताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, जैनमुनी मा.प्रमाणसागरजी म्हणतात, एखादे घर बांधत असताना पाया न बांधता बांधलेले घर कधीही उभे राहू शकत नाही. त्याप्रमाणे आध्यात्माची शिदोरी नसणारे मानवाचे जीवन कधीही यशस्वी होणार नाही. कारण अध्यात्म हाच मानवी जीवनाचा पाया आहे. त्याच्या आधारावरच पुढील वाटचाल करा, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.


कार्यक्रमाच्या प्रारंभी रामायणाचार्य ह.भ.प. रामरावजी ढोक महाराज यांचा भाजपा नेते तथा गोवा राज्याचे प्रभारी माजी. आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर याच्याहस्ते शाल, श्रीफळ  व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार अब्दुल गालीब शेख यांनी केले. कार्यक्रमाला माजी.आ. कव्हेकर साहेबांवर प्रेम करणार्‍या भाजपा पदाधिकारी,कार्यकत्यार्र्ंसह भाविभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


हिंदू हा जात-धर्म नसून एक विचार आहे.
हिंदू हा जात,धर्म,पंथ,वर्ग नसून सत्यावरती आधारित त्रिलोकाचे कल्याण करणारा विचार आहे, त्यामुळे याचा स्वीकार मुस्लीम, ख्रिश्‍चन, हिंदू सर्व करू शकतात. यातच सर्वांचे कल्याण आहे. असे विचार अनेक विचारवंतांनी सांगितले असल्याचेही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

————————————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here