अनिल सावळे यांना ‘सहकारमित्र’ पुरस्कार प्रदान
पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने ‘सकाळ’चे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट अनिल सावळे यांना ‘सहकारमित्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिर्डी (जि. नगर) येथे शनिवारी (ता. २४) आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. सावळे हे २६ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यांनी राज्यातील सहकारी साखर उद्योग, सहकारी पतसंस्था, नागरी सहकारी बॅंका, गृहनिर्माण संस्थांसह सामाजिक, गुन्हेगारी संबंधित विषयांवर वार्तांकन केले आहे. या कार्यक्रमास आमदार सुधीर तांबे, नगरचे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, महासचिव डॉ. शांतीलाल शिंगी, कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव आबा शिंदे, बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे तसेच २६ जिल्ह्यांतील पतसंस्थांचे चेअरमन आणि पदाधिकारी उपस्थित होते.
———–
शिर्डी जि. नगर : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने ‘सकाळ’चे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट अनिल सावळे यांना ‘सहकारमित्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्यासह अन्य पदाधिकारी.
———–











