रस्त्यावर हात दाखवा आमदार थांबवा…
“नो व्हीआयपी कल्चर”
याचे मुख्य कारण म्हणजे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेला कार्यकर्ता आहे.

पवार आडनाव म्हटले कि महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्तावित राजकीय मंडळीचे नाव डोळ्यासमोर हमखास येतच…परंतु हे पवार सामान्य वारकरी संप्रदाय परिवारातील असुन त्यांनी पक्षश्रेष्ठीचा विश्वासाला सार्थ ठरवत पहिल्याच निवडणुकीत औसा विधानसभा मतदारसंघातील जनता जनार्दनाचा मतदान रुपी आशिर्वाद मिळवत आपली “राजकीय पॉवर” दाखवून दिली आणि थेट मुंबई विधानभवनाच्या सभागृहात जागा मिळवली…
हा प्रवास तितका सोपा नव्हताच खालिल छायाचित्रात आपल्याला आमदार अभिमन्यूभैय्या पवार यांनी चांदूर वाडी-वाकसा येथील शेतकरी श्री भरत व्यंजने यांच्या शेतात सुरु असलेल्या गुऱ्हाळाला भेट दिली तसेच उपस्थित शेतकरी बांधवांसह उसाच्या रसाचा आस्वाद
आमदार अभिमन्यूभैय्या पवार हे ऊसाचा रस अन खाली बसुन पितांना दिसत आहे, नवीन पाहणाऱ्या लोकांना हे छायाचित्र नक्कीच आश्चर्यकारक वाटणार आमदार अन खाली बसुन उसाचा रस पितो “ना त्याला बसायला खुर्ची” “ना बसायला चटई” हे साधे व सोपे कल्चरच सर्वात मोठ यश आहे आमदार होण्याचे कारण पहिल्याच निवडणुकीत औसा विधानसभा मतदारसंघातील जनतेने मतदान रुपी आशीर्वाद दिला परंतु या अगोदर सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांचे स्वीय सहाय्यक असतांनी औसा विधानसभा मतदारसंघात तत्कालीन विविध खात्याच्या मंत्रीमहोदय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून मतदारसंघात ३०० कोटी पेक्षा जास्त निधींची विकासकामे २०१९ विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पुर्ण केली….
सरकार नाही म्हणून काय झाल? संकल्पना असल्या कि नवीन पॅटर्न राज्याला देता येतो.
“महाराष्ट्र नव्हे तर देशातील पहिले आमदार अभिमन्यू भैय्या पवार ठरले” शेतरस्ते निधीसाठी संपुर्ण आमदार निधी खर्च करणारे.. तत्कालीन मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रभाऊ फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक असतांनी १५ दिवसाला एकदा २ दिवस लातूर दौरा असायचा या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील विविध विकासाच्या योजना व त्या दृष्टीने त्याचा निपटारा ते मंत्रालयात बसून करत होते.
आजही आमदार असतांनी रस्त्यावर कोणीही हात दाखवला ✋कि त्यांचे वाहन हमखास थांबते, विशेष म्हणजे मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकारी यांचे वाढदिवस ते स्वतःच्या उपस्थितीत साजरे करतात किंवा ते नसल्यावर त्यांचे पिताश्री किंवा चिरंजीव यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे होतात
संतोष लक्ष्मणराव जाधव



