माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या 72 तास 72 शेतकर्यासोबत
अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा ; निटूर कडकडीत बंद…
निलंगा,-( प्रशांत साळुंके )- शेतकऱ्यांना अतिवृष्टीची सरसकट भरपाई मिळावी तसेच पिक विमा मिळावा यासाठी मा. मंञी तथा आ. संभाजीराव पाटील निलंगेकर लातूर येथे उपोषणास बसले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आज निटूरमध्ये ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला व अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिला.
यावर्षी च्या खरीप हंगामात पावसाने शेतक-यांची दैना उडवली आहे हातातोंडासी आलेला घास अतिवृष्टी झाल्याने व महापूर आल्याने हिरावून गेला आहे माञ सरकार अद्यापही शेतकऱ्यांना ठोस अशी मदत जाहीर करत नसल्याने आ. संभाजीराव पाटील निलंगेकर हे 72 तासा साठी लातूर मध्ये शेकडो शेतक-यासह अन्न त्याग आंदोलनास बसले आहेत त्यास पाठिंबा म्हणून आज निटूर ग्रामस्थांनी उत्सफूर्तपणे निटूर मध्ये बंद पाळला व उपोषणास पाठिंबा जाहीर केला.
आज सकाळपासून च व्यापाऱ्याने आपापली दुकाने उघडली नाहीत त्यामुळे बंदला मोठा प्रतिसाद मिळाला.दरम्यान शेतकऱ्यांना अद्यापही पिक विमा व सोयाबीन पिकाचे सरसकट नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतक-यामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी शेतक-यामधून होत आहे .