*अन्नदाते करणार अन्नत्याग*

0
195

शेतकऱ्यांचा राज्य सरकारला ७२ तासाचा अल्टीमेटम….

लातूरच्या शिवाजी चौकात जिल्ह्यातील शेतकरी करणार ७२ तास अन्नत्याग आंदोलन… 

अन्नदाते करणार ; अन्नत्याग आंदोलन….

निलंगा,-(प्रशांत साळुंके)- जिल्ह्यातील मांजरा व तेरणा नदीकाठावर असलेल्या जमीनीवरील उभ्या पिकासह जमीनी खरडून गेल्या असून शेतकऱ्यांना आजतागायत सरकारने मदत जाहीर केली नाही म्हणून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्या सरकारला ७२ तासाचा अल्टीमेटम दिला आहे.या ७२ तासात मदत जाहिर नाही केली तर लातूर येथील शिवाजी चौकात माजी मंञी संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून ७२ शेतकरी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.असा इशारा तहसिलदार याना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

अस्मानी संकटात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ७० टक्के नुकसान झाले असून त्याच बरोबर या सुलतानु सःकटामध्ये धरणातील पाणी व्यवस्थापनाच्या अभावामुळे व चुकीच्या धोरणामुळे मानवनिर्मित हे संकट शेतकऱ्यावर आले आहे.यात मांजरा व तेरणा नदीकाठावरील व ओढ्या लगत असलेल्या जमीनीवरील उभ्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे.तर अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे.आता सदरील जमीन दुरूस्तीसाठी शेतकऱ्यांना वेगळा पैसा खर्च करावा लागणार आहे. तरी सरसकट ७५ हजार प्रति हेक्टर मदत द्यावी व नुकसानभरपाईच्या निकषात दोन्ही नदीकाठच्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने वेगळी आगाऊ रक्कम देण्यात यावी तरच येथील शेतकरी उभा राहिल अन्यथा शेती प्रधान देशातील शेतकरी संपायला वेळ लागणार नाही.तसेच गेल्यावर्षीच्या पिकविमा बाबत चुकीचे संदर्भ लावून जवळपास ८० टक्के शेतकरी पिकविमा लाभापासून वंचित आहेत.त्याना सरसकट विमा रक्कम द्यावी तसेच ७२ तासात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपले झालेले नुकसान आॕनलाईन करावे असा आदेश राज्य सरकारने काढला आहे.तो आदेश रद्द करावा व महसूल आणि कृषी विभागाचा नुकसानीचा निकष ग्राह्यधरून या वर्षीचा विमा सरसकट तात्काळ मंजूर करावा तसेच ७२ तासात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत नाही दिली तर आम्ही लातूर जिल्ह्यात ७२ शेतकरी राज्य सरकारला अल्टीमेटम देत आहोत असा इशारा तहसिलदार गणेश जाधव यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

आज महात्मा गांधीचा मार्ग अवलंबून आंदोलन करतोय येणाऱ्या काळात आम्ही शेतकऱ्यांसाठी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकारी आंदोलनाचा मार्ग अवलंब करू त्याअगोदरच राज्य शासनाने आम्हा शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊन तात्काळ मदत द्यावी असा इशाराही माजी मंञी संभाजीराव पाटील निलंगेकर यानी राज्य सरकारला दिला आहे.

या निवेदनावर भाजपा तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे,नगरध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,विरभद्र स्वामी प.स.सभापती राधा बिराजदार,इरफान सय्यद,युवराज पवार अरविंद पाटील जाजनुरकर,नागेश पाटील,उत्तम लासूने,कुमोद लोभे,कालीदास पाटील,सुमित इनानी नगरसेवक संजय हलगरकर,विष्णू ढेरे,शरद पेठकर,रवि फुलारी,प्रकाश नाटकर,मनोज कोळ्ळे,महेश जाधव,अनिल जाधव,अशीष अट्टल,अमृत बसवदे,राजकुमार सोमवंशी,व्यंकट धुमाळ,विलास लोभे,जनार्धन सोमवंशी,शिवपुञ आग्रे,बंडी देशमुख आदी शेतकरी पदाधिकारी यांच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here