38.1 C
Pune
Monday, April 28, 2025
Homeराजकीय*...अन्यथा भाजयुमोला पुढाकार घ्यावा लागेल-आ.निलंगेकर यांचा इशारा*

*…अन्यथा भाजयुमोला पुढाकार घ्यावा लागेल-आ.निलंगेकर यांचा इशारा*

पोलीस प्रशासनाने लक्ष घालावे अन्यथा धर्मांतर बंदीसाठी
 भाजपा युवा मोर्चाला पुढाकार घ्यावा लागेल
– माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर

लातूर दि.12-01-2023
गोरगरीबांचे धर्मांतर करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे दिसून येत आहे. हे धर्मांतर थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे. परंतु तरीही म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे धर्मांतरचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत अनेक निवेदने देवूनही धर्मांतरच्या प्रक्रीयेवर सक्रीयपणे बंदी घालण्याचे काम केले जात नाही. त्यामुळे आतातरी पोलीस प्रशासनाने लक्ष घालून धर्मांतर बंदीसाठी सक्रीयपणे काम करावे अन्यथा यापुढील कालावधीत धर्मांतर बंदीसाठी भाजपा युवा मोर्चाला पुढाकार घ्यावा लागेल. असे प्रतिपादन राज्याचे माजी कामगार कल्याण, अन्‍न व पुरवठा मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.


यावेळी ते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्यावतीने आयोजित मोती नगर भागातील रामकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित युवा मेळावा व 11 शाखेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. या युवा मेळाव्याला भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुलजी लोणीकर, खा.सुधाकर श्रृंगारे, महाराष्ट्र सांस्कृतिक प्रकोष्ट समितीचे  प्रदेशाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, मनपा स्थायी समितीचे सभापती दीपक मठपती, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे,  भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहर जिल्हा प्रभारी अनिल पाटील बोरगावकर, भाजपाचे लातूर शहर जिल्हा सरचिटणीस दिग्विजय काथवटे, प्रविण सावंत, शिरीष कुलकर्णी, भाजपा युवा मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य विवेकानंदजी उजळंबकर, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव प्रेरणाताई होणराव, अरूण पाठक, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव दत्ता चेवले, अमोलजी निडवदे, गणेश गोमचाळे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य रविशंकर केंद्रे, संजय दोरवे, अरूण पाठक, भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, शोभाताई पाटील, राहुल पाटील, मिनाताई भोसले, नितीन वाघमारे, ओम राठोड, अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे, गजेंद्र बोकण, सागर घोडके, सुनिल राठी, प्रेम मोहिते, रविशंकर लवटे, राजेश पवार, प्रिया जोगदंड, धनंजय आवस्कर, पांडूरंग बोडके, गौरव बिडवे, संतोष तिवारी, पुनम पांचाळ, आकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


पुढे बोलताना यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. यामध्ये सक्रीय काम करणार्‍या तरूणांना संधी दिली जाणार आहे. त्यातही 80 टक्के उमेदवारीचे वाटप पस्तीशीच्या आतील तरूणांना केले जाणार आहे.  आता नेत्याच्या भोवती फिरणार्‍यांना तिकीट नाही. ज्या उमेदवाराच्या घराबाहेर चपलांचा ढीग असेल व जो तरूण सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न मार्गी लावेल त्या तरूणांनाच लातूरच्या राजकारणात संधी मिळेल. तसेच फेसबूक मित्रांमुळे आमदार होता येत नाही तर त्यासाठी सर्वसामान्यांचे प्रश्‍न मार्गी लावावे लागतील. अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी अडीच वर्षे सत्तेत आणि विरोधातही सक्रीयपणे काम करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे त्यांचा योग्य वेळी योग्य तो सन्मान होईल असे मतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केले.


कार्यक्र्रमाच्या प्रारंभी भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाच्या सुरुवात केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व प्रमुख मान्यवरांचे भाजपा युमो लातूर शहर जिल्ह्याच्यावतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुशील सूर्यवंशी यांनी केले तर आभार अ‍ॅड.पुनम पांचाळ यांनी केले. कार्यक्रमाच्या भाजपा युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.  
लातूरच्या प्रिंन्सला भाजपात प्रवेश नाही
लातूरच्या प्रिंसला भाजपात प्रवेश घेण्याची ईच्छा होत आहे. पंरतु ते येत नाहीत. त्यांनी अधिवेशनाच्या काळामध्ये डॉ.बाबासाहेबांच्या लातूरातील 72 पूर्णाकृती पुतळ्याला विरोध करण्याचे काम केले. तसेच कोरोना काळात सर्वसामान्य रूग्ण व नातेवाईकांच्या अडचणी जाणून घेण्याऐवजी फॉरेनला जाण्याचे काम लातूरच्या प्रिन्सने केलेले आहे.  फक्‍त चुकीची कामे झापण्यासाठी त्यांची भाजपात प्रवेश करण्याची ईच्छा दिसून येत होती. परंतु आम्हाला असा प्रिंन्स नको तर आता सर्वसामान्यांसाठी कार्य करणारा सर्वसामान्य कार्यकर्ताच हवा आहे अशी अपेक्षा व्यक्‍त करून या लातूरच्या प्रिंन्सला आता भाजपात प्रवेश नाही. असे वक्‍तव्य करून आम्ही आ.अमित देशमुख व आ.धिरज देशमुख यांच्या प्रवेशाला पूर्ण विराम दिला असल्याचे मतही राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आहे.
राज्यात सर्वाधिक युवा वॉरियर्सच्या शाखा लातूरमध्ये – राहुल लोणीकर
काँग्रेसचा बालेकिल्‍ला भाजपामय करून लातूर शहरातील संघटन वाढविण्याचा प्रयत्न राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केलेले आहे. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सुरू केलेल्या अनेक योजना त्याची शहर व जिल्हास्थरावर अंमलबजावणी त्या-त्या योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्याचे काम भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. त्याची पोचपावती म्हणून लातूर जिल्ह्यातून 8 हजार धन्यवाद मोदीजी यानावाने पत्र व्यवहार करण्याचे काम केलेले आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यासह युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी भाजपा युवा मोर्च्याच्या माध्यमातून केलेल्या कार्यामुळे राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सूरजिसिंह ठाकूर व राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी भूषविलेल्या भाजपा युमो प्रदेशाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मला मिळाली. हे मी माझं भाग्य समजतो. असे वक्‍तव्य करीत संघटनात्मक कौशल्याच्या जोरावर राज्यात सर्वाधिक युवा वॉरियर्सच्या शाखा लातूरमध्ये करण्याचे काम करणार्‍या युवा नेतृत्वाचा येणार्‍या काळात पक्षाकडून योग्य तो सन्मान केला जाईल असे मतही भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी व्यक्‍त केले.
भाजयुमोच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम करू
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, भाजपा सचिव तथा भाजपा युवा मोर्चा प्रभारी विक्रांतदादा पाटील, राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे काम सक्रीयपणे सुरू आहे. आपल्या कार्यातून माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकरांनी काँग्रेसच्या बालेकिल्याला भाजपामय करण्याचे काम केलेले आहे. लातूरकरांच्या अस्मितेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा 72 फुटी पुतळा उभारण्याचे काम करणारे खा.सुधाकर श्रृंगारे यांनी केलेले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भाजपा युमोचे काम भाजपा युवा मोर्चा शहर जिल्ह्याच्यावतीने सुरू आहे. यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना सोबत घेवून कार्य केल्यामुळे भाजपा युवा मोर्चा व लातूरच्या युवा वॉरियर्सची ओळख राज्यभरात झालेली आहे. त्यामुळे यापुढील काळातही पक्षासाठी त्याग आणि बलिदानाची भूमिका घेणार्‍या कार्यकर्त्यांना सोबत घेवून सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम आपण सक्रीयपणे करू असा विश्‍वास भाजपा युवा नेते तथा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी यावेळी प्रास्ताविकात बोलताना व्यक्‍त केला.
———————————————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]