काँग्रेस पक्षाचे नेते नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांची फेरनिवड झाल्याने निलंगा मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव….
निलंगा,—( प्रशांत साळुंके )—काँग्रेस पक्षाच्या माजी मुख्यमंञी पदावर मजल मारणारे निलंग्याचे सुपूञ विकासपुरूष स्व.डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपला दबदबा पक्षामध्ये ठेऊन आपली साधी राहणीमान व उच्चविचारापोटी प्रभावीत केले.नेता कसा असावा हे ज्वंलत उदाहरण डाॅ.निलंगेकर यांच्या संस्कारातून शिकण्यासारखेच असल्यामुळे अनेक कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले आणि पूठे निलंगा विधानसभा मतदारसंघाचे कार्यशिल नेते म्हणून त्यांचे नाव उदयास आले.पूठे त्यांचे सुपूञ काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त प्रदेश सरचिटणीस म्हणून पून्हा पक्षाने कर्तव्यदक्ष अशोकराव पाटील निलंगेकर यांची फेरनिवड करून कामाची पावती पक्षश्रेष्ठींने दिल्याने निलंगा विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यातील कार्यकर्ते उत्साहात दिसत आहे.
काँग्रेस पक्षाचे फेरनिवड झालेले प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर हे संयमी व कामाचा अनुभव द्विगुणीत त्यांची छाप पक्षामध्ये आहे.निलंगा विधानसभा मतदारसंघात सतत सु:खा व दू:खात कार्यकर्त्यांच्या डोअर टू डोअर भेटी घेऊन प्रश्नांची उकलसंच काढून लागलीच त्यावर तोडगा काढून न्याय देण्यासाठी त्यांच्याकडे हातकंडा असल्याने कार्यकर्त्यांचा सतत रोला त्यांच्या भवती असतो हे विशेषत्वाने पाहिले जाते.निलंगा विधानसभा मतदारसंघात फेरनिवड झाल्याने त्यांनी निलंगा,शिरूरअनंतपाळ,देवणी याठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या निवडीमुळे पक्षामध्ये नवचैतन्याची ऊर्जा प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया कार्यकर्ते देत आहेत.त्यांच्या निवडीच्या औचित्याने कार्यकर्त्यांनी त्यांचा गावा-गावात यथोचित सत्कार केला आहे.उत्तम कामाचे नियोजन म्हणून प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्याकडे पाहिले जाते.मागील विधानसभा पक्षाकडून त्यांना निवडणूकीच्या फडात उतरवले होते.माञ,त्यांना यश संपादन करता आले नाही.2019 च्या विधानसभा निवडणूकीत त्यांचे पूतणे माजी पालकमञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याविरूध्दात त्यांनी निवडणूक लढविली होती त्यात त्यांना 65 हजार मते पडली.माञ विजयीभव म्हणून त्यांचे पूतणे आ.निलंगेकर पून्हा निलंगा विधानसभा मतदारसंघाचे सदस्य म्हणून आमदार झाले हे विशेषत्त्वाने पाहिले जाते.आपण येणार्या निवडणूकीत निलंगा विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त वेळे देऊन पक्षसंघटन मजबूत करून विजयीभवार्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करणार असून प्रत्येक निवडणूक संघटनकौशल्यावरच अवलंबून असून आपण सक्षम असल्याचे सांगितले आहे.
आता निलंगा विधानसभा मतदारसंघातील कार्यक्षेञातील निवडणूकीत प्रमुख पक्षातील मातंबर नेते फडात उतरणार असल्याने राजकीय फड सध्या पावसाळ्यात तापत असल्याने येणार्या निवडणूका सरळ आणि सोप्या नसणार यात शंका घेण्याची आवश्यकता नाही.म्हणून प्रमुख पक्षातील नेत्यांनी आपआपल्या कार्यकर्त्यांना संपर्कात राहण्याची आवश्यकता असल्याचे गावा-गावात बोलत आहेत.











