■ जानाई प्रतिष्ठानचा अभियंतादिन उपक्रम
लातूर ; ता १५:
> १५ सप्टेंबर अभियंता दिना निमित्त श्री जानाई प्रतिष्ठान लातूर या संस्थेच्या वतीने दिला जाणारा “अभियंता जानाईश्री ” पुरस्कार सांगली अर्बन बॅंकचे अध्यक्ष, पीएनजी चे संचालक अभियंता गणेश गाडगीळ यांना जाहीर करण्यात आला. कार्याप्रती निष्ठा व समाजाप्रती बांधिलकी जपणा-या अभियांतीची या पुरस्कारासाठी निवड केली जाते.
> महावस्त्र, सन्मानचिन्ह , सन्मानपत्र,सर विश्वेश्वरय्या फेटा, रू १५,०००/- असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. शनिवार दिनांक २४ सप्टेबर रोजी सांय ६ वा. जानाई फंक्शन हाॅल, गीताई संकुल, मित्र नगर येथे अभियंता गणेश गाडगीळ यांना “ अभियंता जानाईश्री ” पुरस्कार देवून सन्मानित केले जाणार आहे .

अभि.गणेश गाडगीळ यंत्र अभियंता असुन ते सुप्रसिध्द पु.ना.गाडगील सराफ व जेव्हरी या संस्थेचे ते भागीदार, पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिध्द सांगली अर्बन बॅंकेचे ते विद्यमान अध्यक्ष, सहकार भारती महा. प्रांताचे कोषाध्यक्ष आहेत.
> याच कार्यक्रमात प्रतिष्ठानने निवड केलेल्या अभियांत्रीकी महाविद्यालयातील गरजू, हुशार, होतकरू, पंधरा विद्यार्थ्यांच्या प्रवेशशुल्काचे धनादेश अभि. गणेश गाडगीळ यांच्या हस्ते वितरीत केले जाणार आहेत.
>पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन अतुल ठोंबरे, डाॅ वैशाली टेकाळे , प्रसाद उदगीरकर, संजय प्र.अयाचित, डाॅ ऋजुता अयाचीत, अर्कि.विजय सहदेव, शिवाजी कांबळे, प्रा.दत्ता मुढे, मनोज सप्तर्षी, महेश औरादे , विजय चोळखने, डाॅ.विश्वास कुलकर्णी,डाॅ.राजेश पाटील, डाॅ. पी.के.शहा, अमोल तांदळे, भूषण दाते, सौरभ ताथोडे, अवधुत जोशी, गौरव कुलकर्णी, वैष्णवी दिवान, गायत्री पत्की कांचन इस्लामपुरे, अमृता कदम, चैतन्य सावंत यांनी केले आहे.




